शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

मिनीबससाठी विद्यार्थ्यांचे उपोषण

By admin | Updated: February 9, 2016 02:23 IST

माथेरान मिनीबस सेवा सुरळीत व्हावी यासाठी माथेरानमधील विद्यार्थ्यांनी सोमवारीपासून कर्जत आगाराजवळ आमरण उपोषणास सुरूवात केली आहे.

नेरळ : माथेरान मिनीबस सेवा सुरळीत व्हावी यासाठी माथेरानमधील विद्यार्थ्यांनी सोमवारीपासून कर्जत आगाराजवळ आमरण उपोषणास सुरूवात केली आहे.कर्जत एसटी महामंडळाची कर्जत- माथेरान मिनीबस सेवा ११ आॅक्टोबर २००८ ला सुरु झाली. बससेवा सुरु झाल्यापासून दिवसभरात सहा फेऱ्या होत असत, परंतु कालांतराने तांत्रिक अडचणी, अपुऱ्या बसेस, बस बंद पडणे आदी अडचणींमुळे या बससेवेत अनियमितता निर्माण झाली. या सर्वांचा फटका येथील पर्यटनावर व खास करून शालेय विद्यार्थी आणि स्थानिकांना बसू लागला. माथेरानमधील विद्यार्थ्यांना दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना कर्जत व अन्य शहरात जावे लागते. यासाठी बस सोयीस्कर असल्याने सर्व विद्यार्थी या बसनेच प्रवास करतात. बसची अपुरी संख्या, जुन्या बसेसमुळे वारंवार बस बंद पडतात. परीक्षेचा कालावधी सुरु आहे. बस रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला उशीर झाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. कर्जत-माथेरान मिनीबस सेवा सुरळीत व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी अनेक वेळा प्रशासनाला निवेदने दिली,आंदोलने केली. परंतु ढिम्म प्रशासनाला जाग यावी यासाठी अखेर माथेरानच्या विद्यार्थ्यांनी व प्रवासी संघटनेने २१ जानेवारीला मिनीबस सेवा सुरळीत व्हावी यासाठी उपोषणाचे पत्र प्रशासनाला दिले होते. परंतु १७ दिवसांच्या कालावधीनंतरही सुरळीत सेवा सुरु न झाल्याने अखेर सोमवारी माथेरानचे नगरसेवक दिनेश सुतार, शालेय विद्यार्थी विशाल परब, अंकित पार्टे, मनीष कदम, सायली झोर आदी विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. यावेळी आमदार सुरेश लाड, भाई थोरवे, वसंत भोईर, आदींनी उपोषण स्थळी भेट दिली. आ. सुरेश लाड म्हणाले की, परिवहन महामंडळाकडे नवीन बस घेण्यसाठी निधी नसेल तर आमदार निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते परंतु बससाठी तशी रक्कम अनुज्ञय नाही असे कळविले आहे, विशेषबाब म्हणून त्यांनी तो प्रस्ताव अर्थ नियोजन मंडळाकडे पाठवून त्या निधीची तरतूद करून घेतली पाहिजे होती. जिल्हाधीकाऱ्यांनी तशी तसदी घेतली नाही. जर एसटीकडे नवीन बस घेण्यासाठी निधी नसेल तर आम्ही लोकवर्गणी किंवा आंदोलन करून प्रशासनाला निधी गोळा करून देऊ.