शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

चारही बंदरांचे कामकाज थंडावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 04:54 IST

जेएनपीटीच्या डीपीडी धोरणाविरोधात बुधवारपासून वाहतूकदारांनी सुरू केलेले असहकार आंदोलन सुरूच असल्याने जेएनपीटीअंतर्गत असलेल्या चारही बंदरांतील कामकाज थंडावले आहे.

उरण : जेएनपीटीच्या डीपीडी धोरणाविरोधात बुधवारपासून वाहतूकदारांनी सुरू केलेले असहकार आंदोलन सुरूच असल्याने जेएनपीटीअंतर्गत असलेल्या चारही बंदरांतील कामकाज थंडावले आहे. मालवाहू जहाजांवरील होणारी चढ-उतार वगळता चारही बंदरांत गुरुवारी (१० मे) एकही कंटेनरची वाहतूक झाली नाही. यामुळे बंदराच्या कामकाजावरही मोठा परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. रस्ता मार्गे होणारी वाहतूकच ठप्प झाल्याने मात्र जेएनपीटी परिसरातील रस्ते सुनसान होते.जेएनपीटीने डीपीडी धोरणाची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू असतानाच चारही बंदरांतून कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या राज्यातील विविध संघटनांच्या वाहतूकदारांनी बुधवारपासून असहकार आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यामुळे बुधवारपासूनच चारही बंदरांत कंटेनरची वाहतूक ठप्प झाली आहे.जेएनपीटीने अवलंबिलेल्या डीपीडी धोरणाविरोधात असहकार सुरू करणाºया वाहतूकदारांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी डीसीपी डॉ. राजेंद्र माने यांनी पुढाकार घेतला. मात्र वाहतूकदार आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने कोणताही तोडगा निघाला नव्हता. वाहतूकदारांनी सुरू केलेल्या आंदोलनाबाबत जेएनपीटी पुढाकार घेईल, अशी अपेक्षा वाहतूकदारांना होती. मात्र जेएनपीटी अध्यक्षांऐवजी दुय्यम अधिकाºयांशी चर्चा करण्यास वाहतूकदार तयार नाहीत. त्याशिवाय याबाबत जेएनपीटी प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल यांनीही आंदोलक वाहतूकदारांशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधला नाही. त्यामुळे जेएनपीटीलाच आंदोलकांशी चर्चा करण्यात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे जेएनपीटीशी चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया महाराष्टÑ हेवी व्हेईकल इंटरस्टेट ओनर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पैठणकर यांनी व्यक्त केली.जेएनपीटीची अशीच ताठर भूमिका कायम राहिल्यास आंदोलन मागे घेण्याबाबत निश्चित तोडगा निघेल याबाबत पैठणकर यांनी शंका व्यक्त केली.