शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड-पनवेल गाडीला कर्जतला थांबा द्यावा

By admin | Updated: February 16, 2017 02:09 IST

काही दिवसांपूर्वी हुजूर साहेब नांदेड - पनवेल अशी विशेष त्रैसाप्ताहिक गाडी सुरू करण्यात आली होती. ही विशेष गाडी १६ आॅक्टोबर

कर्जत : काही दिवसांपूर्वी हुजूर साहेब नांदेड - पनवेल अशी विशेष त्रैसाप्ताहिक गाडी सुरू करण्यात आली होती. ही विशेष गाडी १६ आॅक्टोबर, २०१६ ते ३१ जानेवारी, २०१७ या कालावधीकरिता सुरू करण्यात आली होती. मात्र, ही गाडी फक्त एक दिवस सोडून, रोजच सुरू करण्यात आली आहे. या गाडीला नांदेडहून पनवेलला जाताना कर्जतला थांबा न दिल्यामुळे रेल्वे प्रशासन कर्जतकरांवर अन्याय करीत असल्याचे मत कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी व्यक्त केले आहे.नांदेडहून पनवेलला जाताना ही गाडी कर्जतला सकाळी साधारण ८.३०च्या सुमारास येते, त्यामुळे कर्जतहून पनवेलला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खूपच सोईची आहे. या गाडीला कर्जतमध्ये थांबा दिल्यास कर्जतकरच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. सध्या याच वेळेदरम्यान कर्जतहून पनवेलला जाण्याकरिता एकही गाडी नसल्यामुळे कर्जतकर प्रवासी बसने किंवा रिक्षाने जात असतात. सकाळी ८.३०च्या दरम्यान कर्जतहून पनवेलला जाण्याकरिता एकही गाडी नसल्याने नाईलाजाने कर्जतकरांना पनवेलला बसनेच जावे लागते.नांदेड-पनवेल ही गाडी रोजच केल्यामुळे कर्जतकर खूश झाले. मात्र, गाडीचा थांबा कर्जतला नसल्याने कर्जतकरांच्या आनंदावर विरजन पडले. त्यामुळे गाडीला कर्जत रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा, अशी मागणी कर्जतकरांकडून होत आहे.ही गाडी पनवेलला सकाळी ९ वाजता पोहोचल्यानंतर दुपारी ४ वाजता ती गाडी परत नांदेडला रवाना होते. म्हणजे जवळ जवळ सात तास गाडी पनवेललाच उभी असते. यामुळे या गाडीला कर्जतला थांबविल्यास कुठल्याही प्रकारचे नुकसान किंवा गाडीला उशीर होणार नाही. तसेच या गाडीचा थांबा कर्जतला दिल्याने त्याचा फायदा फक्त कर्जत पुरताच मर्यादित न राहता तो कर्जत ते सीएसटीपर्यंत सगळ्याच प्रवाशांना होणार आहे. कारण, ही गाडी पनवेलपर्यंतच असल्याने ज्या प्रवाशांना नेरळ, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, ठाणे, दादर म्हणजेच सीएसटीपर्यंत जाण्यासाठी तिचाउपयोग होणार आहे. ही गाडी नांदेडहून शनिवारी सोडून रोजच संध्याकाळी ५.३० वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी पनवेलला ९ वाजता पोहोचणार आहे. ही गाडी पनवेलहून रविवारी सोडून रोजच दुपारी ४ वाजता सुटणार आहे. (वार्ताहर)