शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

केंबुर्ली गावाजवळ गंधकाने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 23:01 IST

महिन्याभरापूर्वी ट्रक उलटला : पोलीस प्रशासनाची तारांबळ

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली गावाजवळ रसायन घेऊन जाणारा ट्रक जून महिन्यात पलटी झाला होता. यातील गंधकाची पावडर रस्त्यालगत अपघातामुळे पसरली गेली. या घटनेला आता महिना झाला असला तरी अद्याप हे गंधक काढण्यात आले नव्हते. गंधक पावडरला रविवारी अचानक आग लागली. यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. नदी आणि महामार्गाच्या मध्ये पडलेल्या या गंधक पावडरकडे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले.

केंबुर्ली गावाजवळ २२ जून रोजी रात्री १० च्या सुमारास एक ट्रक पलटी झाला होता, यामध्ये दोन जण जखमी झाले होते तर ट्रकमधील गंधकही पसरले होते. आता या घटनेला एक महिना होत आला तरीदेखील संबंधित ट्रकमालक, कंपनी आणि प्रशासनाने याची दखल घेतली नाही. या ठिकाणी पडलेला ट्रक केवळ उचलून नेण्यात आला. मात्र, पिवळ्या रंगाचे गंधक तिथेच पडून राहिले. इंडस्ट्री वापरासाठी असलेल्या या गंधकाबाबत दुर्लक्ष केल्याने रविवारी या गंधकाने अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून पोलिसांना समजताच पोलिसांची तारांबळ उडाली. नदी आणि महामार्ग यादरम्यान पडलेल्या गंधकाने नदीलादेखील धोका निर्माण होऊ शकत होता. या गंधकाबाबत दुर्लक्ष केल्याने हा प्रकार झाला असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

रविवारी सकाळी पडलेले गंधक धुमसू लागले आणि कालांतराने या गंधकाने पेट घेतला. त्यानंतर पोलिसांकडून महाड एम.आय.डी.सी.च्या अग्निशमन पथकाचे बंब मागवण्यात आले. मात्र, पाण्याशी संपर्क आल्याने या गंधकाने अधिकच पेट घेतला. यामुळे पोलीस प्रशासन चांगलेच हादरले. अखेर महामार्ग बांधकाम विभागाच्या ठेकेदार कंपनीकडून माती मागवण्यात आली आणि ही माती वरून टाकण्यात आली, यामुळे गंधकाला लागलेली आग आटोक्यात आली. घटनास्थळी नायब तहसीलदार अरविंद घेमुड हेदेखील दाखल झाले.

पोलीस प्रशासनाची डोळेझाकजून महिन्यातील २२ तारखेला हा अपघात झाला होता. या अपघातात ट्रक पलटी झाला, तर दोन जण जखमी झाले होते. या ठिकाणाहून ट्रक काढण्यात आला. मात्र, ज्या कंपनीचा माल होता त्याने मात्र हा माल येथून काढून नेला नाही. पोलीस प्रशासनानेही या कंपनीला बजावले नाही. यामुळे गंधकासारखे रसायन गावाशेजारी पडून राहिले. या गंधकाचा धोका जनावरे आणि लहान मुलांना असतानाही याबाबत बेजबाबदारी पोलीस प्रशासनाने दाखवली. या गंधकाबाबत आजही अनभिज्ञता आहे.