शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’साठी अजूनही १२ कोटींची गरज

By admin | Updated: November 20, 2015 02:22 IST

जलयुक्त शिवार योजनेतून साडेतेराशे कामांसाठी सुमारे ४२ कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्यापैकी ३५१ कामे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी सात कोटी ३५ लाख ५७८ हजार रुपयांचा

- आविष्कार देसाई,  अलिबाग

जलयुक्त शिवार योजनेतून साडेतेराशे कामांसाठी सुमारे ४२ कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्यापैकी ३५१ कामे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी सात कोटी ३५ लाख ५७८ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. जिल्ह्याला १२ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. १४ कामे प्रगतिपथावर असली, तरी ३१ मार्च अखेर सर्व कामांचा निपटारा करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाला पेलावे लागणार आहे.रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने पाऊस पडून देखील नियोजना अभावी पाणीटंचाईला सप्टेंबर महिन्यापासूनच सुरुवात होते. विविध नळपाणी पुरवठ्याच्या योजनाची कामेही जिल्ह्यात मोठ्या संख्येने सुरु असतानाच जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.जलयुक्त शिवार योजनेतून जिल्ह्यात एक हजार ३५० कामे सुचविण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार योजनेसाठी सुमारे ४२ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. जिल्ह्यात ३५१ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यासाठी सात कोटी ३८ लाख ९० हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे. १४ कामे प्रगतिपथावर आहेत. जिल्ह्याला अद्यापही १२ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून सीएसआर फंडातून जिल्हा प्रशासनाला फक्त दोन कोटी रुपयेच प्राप्त झाले आहेत. आवश्यक निधी प्राप्त झाल्यावर मार्चअखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करता येतील असे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी के.बी. तरकसे यांनी सांगितले. २६ जानेवारीमध्ये या कामांना सुरुवात झाली होती. योजना समजावून घेत पावसाळा सुरु झाला. त्यामुळे पावसाळ््यात कामाची गती मंदावली होती. आता कामाला पुन्हा जोमाने सुरुवात झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेतील झालेली कामेसलग समतल बंधारा, माती नाला बंधारा, दगडी बंधारा, गॅबियन बंधारा, शेततळे, बंधारा दुरुस्ती, वळण बंधारे, सिमेंट बंधारे उभारण्यात आले आहेत. अलिबाग तालुक्यात १५ कामे झाली असून यासाठी १७ लाख ७६ हजार खर्च आला. पेणमध्ये ३४ कामे ६२.९८ खर्च, मुरुड २४ कामे ०७.०४ खर्च, खालापूर ४८ कामे ९८.१९ खर्च, कर्जत २८ कामे १३८.२९ खर्च.पनवेल २३ कामे झाली असून यासाठी १०२ लाख ४६ हजार रुपये खर्च आला आहे. माणगाव तालुक्यात ७ कामे ३.४८ खर्च , तळा १८ कामे ३२.४५ खर्च , रोहे ४६ कामे ३६.१० खर्च, सुधागड-पाली १२ कामे ३४.८० खर्च, ंमहाड ३७ कामे ९१.९६ खर्च, पोलादपूर ४३ कामे १९.०५ खर्च, म्हसळा ४ कामे १२.०५ खर्च , श्रीवर्धन ३६ कामे ८१.७४ खर्च.जलयुक्त शिवार योजनेतील कामेसलग समतल बंधारा, माती नाला बंधारा, दगडी बंधारा, गॅबियन बंधारा, शेततळे, बंधारा दुरुस्ती, वळण बंधारे, सिमेंट बंधारे उभारण्यात आले आहेत. या कामांचा या योजनेमध्ये समावेश आहे.