शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'स्वदेशी'चं काय झालं..?; लोकपाल सदस्यांना ७० लाखांची BMW देण्यावरून राजकारण तापलं !
2
कठीण काळात आणखी घट्ट होतेय भारत-रशिया मैत्री; प्लॅन जाणून ट्रम्प यांचा आणखी थयथयाट होणार!
3
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
4
Viral Video: गळ्यात गमछा, कमरेला लुंगी! भोजपुरी गाण्यावर तरुणीचा जबरदस्त डान्स, नेटकरी झाले फिदा
5
बाल्कनीतून पाय घसरला, पती ग्रिलवर लटकला; वाचवण्यासाठी पत्नी धावली, पण नियतीने डाव साधला!
6
सर्वसामान्यांसाठी खुशखबर...! लग्नसराईपूर्वीच सोन्या-चांदीच्या भावात घसरण, चेक करा १८,२२,२३ अन् २४ कॅरेटचा लेटेस्ट रेट
7
३ दिवसांत २७% नी वाढला 'हा' छोटा शेअर; एकावर १ फ्री स्टॉक देणार कंपनी, शेअर विभाजनाचीही घोषणा
8
जेवण केलं, पत्नीसोबत खोलीत गेले, त्यानंतर बाथरूमध्ये जाताच..., ब्राह्मोसवर काम करणाऱ्या इंजिनियरचा संशयास्पद मृत्यू
9
जिद्दीला सॅल्यूट! अवघ्या २२ व्या वर्षी झाली IAS; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
10
“आम्हाला राहुल गांधींना PM करायचेय, काँग्रेस मुंबईचे महापौरपद काय घेऊन बसलेय”: संजय राऊत
11
Gulab Jamun : ना गुलाब ना जामून, मग या गोड पदार्थाला कसं पडलं हे नाव? सगळ्यांनाच खायला आवडतं पण माहिती कुणालाच नसेल!
12
इंदूरमध्ये पेंटहाऊसला भीषण आग; 'डिजिटल लॉक' अडकल्याने काँग्रेस नेत्याचा गुदमरून मृत्यू, पत्नी, मुलीची प्रकृती चिंताजनक
13
कुटुंबीयांना कॉल केला अन्...; रशियात नदीकाठी सापडले कपडे, ३ दिवसांपासून अजित बेपत्ता
14
Crime: तीन वर्षांच्या मुलासह महिलेची सातव्या मजल्यावरून उडी; सासरच्या लोकांवर गंभीर आरोप
15
Railway Accident: 'रील'चे वेड जीवावर बेतले; रेल्वेच्या धडकेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
16
"त्यांचा काहीतरी व्हिडीओ हाताला..."; मुंबईत कमळ फुलणार म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर मनसेचा निशाणा
17
महाआघाडीचं ठरलं, बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, तर उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' नेत्याच्या नावाची घोषणा
18
भ्रष्टाचारावर 'महागडी' नजर! ७० लाखाच्या BMW कारमधून फिरणार लोकपाल; ड्रायव्हर्सनाही ट्रेनिंग
19
"मी सौदी अरेबियात अडकलोय, वाळवंटात उंट...", ढसाढसा रडत तरुणाने मागितली मोदींकडे मदत
20
Meta Layoffs: आता AI कर्मचाऱ्यांनाच कपातीचा फटका! Mark Zuckerberg च्या एआय टीममधील शेकडो लोकांना नारळ

एपीएमसीमध्ये २ लाख ८५ हजार वाहनांचे निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:38 IST

संडे अँकर । कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना : औषध फवारणी केल्यानंतरच मार्केटमध्ये प्रवेश; प्रतिदिन साडेनऊशे वाहनांनाच परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाचे निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत तब्बल २ लाख ८५ हजार वाहनांचे निर्जंतुकीकरण केले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या उपाययोजना केल्या जात आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून राज्यातील ३०५ बाजार समित्यांमध्ये सर्वाधिक उपाययोजना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राबविण्यात येत आहेत. मार्केट आवारातील प्रादुर्भाव कमी करणे व मुंबईकरांना अखंडपणे जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करता यावा यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.याचाच भाग म्हणून मार्केटमध्ये येणाºया प्रत्येक वाहनावर औषध फवारणी केली जात आहे. शेतमाल घेऊन येणारी वाहने, खरेदीदार व व्यापाऱ्यांच्या वाहनांवरही औषधांची फवारणी केली जात आहे. वाहनांमुळे विषाणूंचा प्रचार होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. गाडी चालविणाºयांनाही मास्क घालण्याच्या व सॅनेटायझर वापरण्याच्या सूचना केल्या जात आहेत. २० मार्चपासून आतापर्यंत तब्बल २ लाख ८५ हजार वाहनांवर औषध फवारणी केली आहे. पाचही मार्केटमध्ये आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती सचिव अनिल चव्हाण यांनी दिली आहे.बाजार समिती प्रशासनाने मार्केटमध्ये येणाºया वाहनांच्या संख्येवरही निर्बंध घातले आहेत. पाचही मार्केटमध्ये शेतमाल घेऊन येणाºया साडेनऊशे वाहनांनाच प्रतिदिन प्रवेश दिला जात आहे. खरेदीदारांच्या वाहनांसाठीही परवाना घेणे बंधनकारक आहे. मार्केटमधील व्यापारी व इतर काम करणाºया व्यक्तींनाच आतमध्ये प्रवेश दिला जात आहे. विनाकारण कोणालाही मार्केटमध्ये फिरू दिले जात नाही.