शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

‘बल्लाळेश्वर’ पार्र्किंगमध्ये गाडीतून लॅपटॉप चोरी

By admin | Updated: October 3, 2015 02:27 IST

महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे श्रीक्षेत्र बल्लाळेश्वर मंदिराच्या मोफत पार्किंगमध्ये गुरु वारी रात्री पावसाचा फायदा घेत चोरट्याने स्वीफ्ट कारची समोरील काच

पाली : महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे श्रीक्षेत्र बल्लाळेश्वर मंदिराच्या मोफत पार्किंगमध्ये गुरु वारी रात्री पावसाचा फायदा घेत चोरट्याने स्वीफ्ट कारची समोरील काच फोडून लॅपटॉपची चोरी केली. या घटनेमुळे पार्र्किं गमध्ये गाड्या लावणाऱ्या मालक व चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.ठाणे येथील मंगेश माणिकराव वसू हे आपल्या कुटुंबीयांसोबत श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रात्री साडे आठ वाजता आले. वाहनतळावर गाडी लावून ते दर्शनासाठी गेले. याच वेळेस जोरात पाऊस सुरु झाला व विद्युत पुरवठा बंद झाला. अंधाराचा फायदा घेत चोरट्याने गाडीची काच फोडून गाडीतील लॅपटॉपची बॅग व मोबाइलसह कॅमेरा व इतर साहित्य चोरु न नेले. दर्शन आटोपून मंगेश वसू गाडीकडे आले त्यावेळी काच फोडून चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पाली पोलीस स्टेशनमध्ये घटनेची तक्रार केली.पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व परिसरात पाहणी केली असता वाहन तळाशेजारीच असलेल्या आरोग्य केंद्राच्या शवविच्छेदनाच्या खोलीजवळ बॅग आढळली व त्यात मोबाइलसह लॅपटॉप सापडला मात्र पावसात ही बॅग संपूर्ण भिजल्यामुळे वस्तूचे नुकसान झाले. चोरट्याने कोणत्या हेतूने चोरी केली ते समजू शकले नाही. बल्लाळेश्वर देवस्थानचे गणेश भक्तांसाठी दीड एकर जागेचे हे डांबरीकरण केलेले पार्र्किं ग आहे. मात्र पार्किंगमध्ये सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्हीची सोय नाही. रात्रीच्या वेळेस या वाहनतळावर बऱ्याच गणेश भक्तांच्या गाड्या उभ्या असतात त्या गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चोऱ्या व गैरप्रकार थांबविण्याच्या दृष्टीने देवस्थानकडून वाहनतळावर सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षा रक्षकाची व्यवस्था करण्यासंबंधीचे विनंती पत्र पाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी देवस्थानला दिले आहे.याबाबत देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय धारप म्हणाले की, श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या गणेशभक्तांच्या वाहनांची तोडफोड करुन झालेली चोरी ही गंभीर बाब असून लवकरच देवस्थानच्या वतीने संपूर्ण वाहनतळावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील व सुरक्षा रक्षकाची सोय करण्यात येईल. (वार्ताहर)