शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

कर्जतमध्ये जनावरे चोरण्याचा डाव फसला

By admin | Updated: February 1, 2016 01:41 IST

पोही येथील जनावरांना चोरट्यांनी गुंगीचे इंजेक्शन देऊन शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पळविण्याचा प्रयत्न केला. परंतु एका ग्रामस्थाच्या सतर्कतेने चोरांचा

कर्जत : पोही येथील जनावरांना चोरट्यांनी गुंगीचे इंजेक्शन देऊन शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पळविण्याचा प्रयत्न केला. परंतु एका ग्रामस्थाच्या सतर्कतेने चोरांचा जनावरे चोरण्याचा डाव फसला आणि ते गाडीसह पळून गेले. याबाबत पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील नेरळ - कळंब रस्त्यालगत पोही गाव असून गावातील सदाशिव म्हसे यांचा एक बैल अरु ण नाना भोईर पोही यांची एक गाय व मारु ती भोईर यांचा एक बैल अशा तीन जनावरांना मानेवर गुंगीचे औषध देऊन जनावरे पळविण्याचा प्रयत्न होता. चोरट्यांनी आपली सफेद रंगाची पिकअप गाडी नेरळ - कळंब रस्त्यावर उभी करून येथील तीन जनावरांना शनिवारी पहाटे ३.३० च्या सुमारास गुंगीचे औषध दिले व ती जनावरे पळविण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी मधुकर भोईर हे झोपेतून जागे झाले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. ते ओरडताच चोर गाडीसह नेरळच्या दिशेने पळून गेले. दोन वर्षांपूर्वीही पोही गावातील एका शेतकऱ्याचे बैल चोरून नेल्याची घटना घडली होती. परंतु त्याचा तपास अद्याप लागला नाही. सकाळी गुंगीचे इंजेक्शन दिलेल्या जनावरांना कळंब येथील पशुवैद्यकीय रु ग्णालयात नेण्यात आले. तेव्हा हे गुंगीचे औषध दिल्यानंतर जनावरे सुमारे सात ते आठ तास गुंगीत असतात, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु जनावरे चोरणाऱ्यांचा पोलिसांनी लवकरात लवकरच शोध घ्यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)