शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाचा सुवर्णमध्य, सोमवारपासून बदली प्रक्रियेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:09 IST

आगारातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन चार महिने झाले तरी अद्याप त्यांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त केले नव्हते. वरिष्ठांनी केलेल्या दिशाभुलीच्या प्रकारामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते

कर्जत : येथील आगारातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन चार महिने झाले तरी अद्याप त्यांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त केले नव्हते. वरिष्ठांनी केलेल्या दिशाभुलीच्या प्रकारामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचा भंग केल्याने कर्जत आगार व्यवस्थापकांवर विश्वास नसल्याने ऐन उन्हाच्या तडाख्यात १ मे कामगार दिनाच्या दिवशीच आम्हाला त्वरित बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करावे, या मागणीसाठी आठ कर्मचाऱ्यांनी कर्जत बस आगाराच्या बाहेर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. मागण्या मान्य झाल्यानंतर २ मे रोजी रात्री उपोषण सोडण्यात आले.

मध्यवर्ती कार्यालय मुंबई व विभागीय कार्यालय राज्य परिवहन रायगड विभाग यांनी २८कर्मचाºयांच्या बदल्या केल्या होत्या. कर्जत आगार व्यवस्थापक यांना डिसेंबर २०१८च्या आदेशाने बदलीचे आदेश दिले असताना आज चार महिने झाले तरी आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. याबाबत आगार व्यवस्थापक शंकर यादव यांना बदली झालेल्या कर्मचाºयांनी विचारले असता होळी झाल्यावर कार्यमुक्त करू असे तोंडी सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून त्यांच्या मर्जीतील पाच कर्मचाऱ्यांची आर्थिक देवाणघेवाण करून बदली केल्याचा उपोषणकर्त्या कर्मचाºयांनी आरोप केला होता. ज्या पाच जणांची बदली केली होती, ती सेवाज्येष्ठता यादी डावलून केल्याचे त्यांचे म्हणणे होते. याबाबतीत कर्जत व्यवस्थापकांना सेवाज्येष्ठता यादीनुसार बदली करा, आमच्याही शैक्षणिक व कौटुंबिक अडचणी आहेत, अशी विनवणी करूनही बदलीच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात असल्याने केलेल्या उपोषणाच्या दुसºया दिवशी अनेकांनी उपोषणाच्या ठिकाणी भेटी दिल्या.

आठ उपोषणकर्त्यांपैकी २मे रोजी हुसेन गेडाम, उमेश चांदेकर, विनोद उईके, विनोद कनाके, विनोद आत्राम या पाच उपोषणकर्ते कर्मचारी यांना कमी रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना संध्याकाळी सहा वाजता कर्जत उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी या उपोषणकर्त्यांच्या संपर्कात होत्या. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी मोबाइलवरून संपर्क केला असता त्यांच्या सचिवांनी पेण विभागीय कार्यालयात संपर्क केला.त्यामुळे त्यांनी उपोषणकर्त्यांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी विभागीय कर्मचारी अधिकारी प्रदीप जाधव यांना चर्चा करण्यासाठी पाठविले. यावेळी प्रदीप जाधव, निवासी तहसीलदार सुधाकर राठोड, कामगार अधिकारी प्रवीण पाटील, कर्जत आगार व्यवस्थापक शंकर यादव, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नगरसेविका विशाखा जिनगरे, स्वामिनी मांजरे, विवेक दांडेकर, माजी नगरसेवक संतोष पाटील, अरविंद मोरे यांच्यात चर्चा झाली आणि सुवर्णमध्य निघाला. सोमवार६ मेपासून प्रत्येकी दोन असे चार चार दिवसांनी बदली झालेल्या कर्मचाºयांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात येईल असा शब्द आणि लेखी प्रदीप जाधव यांनी उपोषणकर्त्यांच्या समोर सर्वानुमते मान्य केले. त्यांना कर्जत आगार व्यवस्थापक यांच्या सहीचे पत्र देण्यात आले. रात्री साडेदहा वाजता नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या हस्ते उपोषणकर्ते राजेश आपोतीकर, गणेश चांदेकर, बाजीराव शिंदे या तिघांनी सरबत घेऊन उपोषण सोडण्यातआले.

टॅग्स :StrikeसंपKarjatकर्जत