शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आंबेत पुलाचे काम आठ दिवसात सुरू करा, पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

By राजेश भोस्तेकर | Updated: October 31, 2022 14:09 IST

निविदा पुढे ढकलणे कामाची चौकशी करण्याचे पालकमंत्रीचे संकेत

अलिबाग : आंबेत पुलाच्या कामाची निविदा पुढे पुढे ढकलली जात आहे. याबाबत मला चौकशी लावावी लागेल आणि श्रेय वादावरून निविदा प्रक्रिया पुढे जात असेल तर ते चुकीचे आहे. टेंडर प्रक्रिया रखडल्याने जनतेच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत आहे. जनतेची गैरसोय होत आहे. याचे उत्तर काय असा जाब पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे. टेंडर प्रक्रिया आज पूर्ण करून आठ दिवसात पुलाचे काम सुरू करा. जर तर वर कोणाचा विश्वास नाही. कामाचा नारळ फोडण्यास आम्ही येणार असल्याची ताकीद पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. या पुलासाठी दहा कोटींचा खर्च होणार आहे.

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा आंबेत पुल स्वर्गीय तत्कालीन मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्या दूरदृष्टी तून निर्माण झाला होता. त्यामुळे रत्नागिरी ला वळसा न घालता प्रवाशाचा वेळ वाचत होता. मात्र गेल्या तीन चार वर्षापासून पुल हा नादुरुस्त झाला असून साडे सोळा कोटी खर्च करण्यात आला आहे. मात्र तरीही हा पूल वाहतुकीस बंद ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी जाणाऱ्या प्रवाशांना वळसा घेऊन प्रवास करावा लागत आहे. 

आंबेत पुल बंद असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. शासन आणि प्रशासनाला यामुळे प्रवाशाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. १३ ऑक्टोंबर रोजी जिल्हा नियोजन समिती बैठक पालकमंत्री उदय सामंत याच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी आंबेत पुलाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार आज ३१ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात राजस्व सभागृहात आंबेत पुलाबाबत अधिकाऱ्याची आढावा बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांना पालकमंत्री यांनी फैलावर घेतले. आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर तसेच अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होते.

आज निविदा उघडली जाणार असल्याचे अधिकारी यांनी सांगितले. त्यावेळी काम पंधरा दिवसात नाही तर आठ दिवसात ठेकेदाराने काम सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. त्यामुळे आंबेत पुलाचा प्रश्न पालकमंत्री याच्या निर्देशानुसार लवकर सुटेल आणि प्रवाशाची समस्या सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. नवीन पुल बांधला गेला असता....आंबेत पुलाचे दुरुस्तीचे काम दोन वर्षापासून सुरू असून अपूर्णच आहे. दुरुस्तीच्या कामावर साडे सोळा कोटी खर्च करण्यात आला आहे. नवीन दुरुस्ती साठी दहा कोटी खर्च होणार आहे. यावर नवीनच पुल बांधला असता तर बरे झाले असते असे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. 

राज्य परिवहन विभागाशी बोलून रोरोतून बस सेवा सुरू कराआंबेत पुल बंद असल्याने वाहतूक बंद ठेवली आहे. पर्यायी सेवा म्हणून नदीतून रो रो सेवा सुरू आहे. अवजड वाहने रो रो मधून जात आहेत. मात्र एस टी बस नेली जात नाही. यासाठी राज्य परिवहन रायगड विभागच्या अधिकाऱ्यांशी बोलून ती सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. बसच्या क्षमतेपेक्षा कमी प्रवसी संख्या बसवून बस सोडण्याबाबत प्रयत्न करा अशा सूचनाही पालकमंत्री सामंत यांनी केल्या आहेत.