शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मी आॅर्गॅनिक्सवर धडक मोर्चा

By admin | Updated: June 1, 2016 02:55 IST

महाड औद्योगिक क्षेत्रातील लक्ष्मी आॅर्गॅनिक्स लिमिटेड या कारखान्यात उत्पादन केले जाणारे डायकेटीन हे आरोग्यास अपायकारक आणि प्रदूषणकारी उत्पादन त्वरित बंद करावे

महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील लक्ष्मी आॅर्गॅनिक्स लिमिटेड या कारखान्यात उत्पादन केले जाणारे डायकेटीन हे आरोग्यास अपायकारक आणि प्रदूषणकारी उत्पादन त्वरित बंद करावे, या मागणीसाठी कारखान्यालगतच्या आसनपोई ग्रामस्थांनी भव्य मोर्चा काढला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शीघ्र कृती दलासह कडकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. कारखान्याच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी हा मोर्चा अडवला. ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने कंपनी व्यवस्थापनाला लेखी निवेदन देऊन याबाबत त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी केली.महाड औद्योगिक क्षेत्रात लक्ष्मी आॅर्गॅनिक्सचे हे दुसरे युनिट गेल्या सहा वर्षांपासूनच कार्यरत असून, कारखान्यातील डायकेटीन हे उत्पादन आरोग्यास अपायकारक तसेच प्रदूषणकारी असल्याने हे उत्पादन बंद करण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत इशारा दिलेला होता. मंगळवारी सकाळी १०.३० वा. आसनपोई येथून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात माजी उपसभापती चंद्रकांत जाधव, सरपंच वसंत खोपडे, तंटामुक्ती अध्यक्ष राजाराम माने, लक्ष्मण गरुड, नारायण जाधव, दीपक गायकवाड, सुनीता गायकवाड, परेश सोनावणे, ज्ञानेश्वर जाधव, ग्रामपंचायत सदस्य माधुरी गुडेकर, कुंदा जाधव आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. लक्ष्मी आॅर्गॅनिक्स डेप्युटी जनरल मॅनेजर जे. टी. सूर्यवंशी व पर्सनल मॅनेजर अ‍ॅड. विनोद देशमुख यांनी ग्रामस्थांचे हे निवेदन स्वीकारले. याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाकडून ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला देण्यात आले.सोमवारी रात्री प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी डॉ. ए. एन. हर्षवर्धन, आ. भरत गोगावले, तहसीलदार संदीप कदम आदी अधिकाऱ्यांसमवेत ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. समितीने केलेल्या परीक्षणाच्या अहवालानंतर याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले.