शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत आगारातील ST कर्मचारी आक्रमक; ७ एप्रिलपासून उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 01:18 IST

कर्जत एसटी आगाराचा खालापूर आणि कर्जत या दोन तालुक्यात पसारा आहे. खोपोली एसटी स्थानकातील सर्व काम कर्जत आगारातून होत असते

कर्जत :  कर्जत एसटी आगारातील कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि आगार प्रमुख यांच्याकडून होत असलेल्या कारवाई विरोधात आक्रमक झाले आहेत.  गेली अनेक महिने आगार प्रमुख यांना कामगार संघटनेकडून निवेदने दिली जात आहेत. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी ७ एप्रिलपासून उपोषणाला बसणार आहेत.

कर्जत एसटी आगाराचा खालापूर आणि कर्जत या दोन तालुक्यात पसारा आहे. खोपोली एसटी स्थानकातील सर्व काम कर्जत आगारातून होत असते. कर्जत एसटी आगारातील कर्मचारी आगार प्रमुख शंकर यादव यांच्या मनमानी कारभाराला कंटाळले आहेत. अधिकृत कामगार संघटना आपल्या समस्यांबाबत आणि कामगारांच्या वैयक्तिक समस्या, अडचणी यांच्याबाबत आगार प्रमुख यांना अडचणी ऐकून घेण्याची मागणी करीत आहेत. मात्र आगार प्रमुखांकडून कामगारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यात ३० जुलै रोजी कामगारांचे नियमबाह्य निलंबन करण्यात आल्यानंतर त्या कामगारांचे आणि संघटनेचे म्हणणे अद्याप आगार प्रमुख यांनी ऐकून घेतले नाही. कोरोना महामारीत कामगारांच्या रजा मंजूर करताना भेदभाव केला आणि प्रकृती ठीक नसलेले कामगार उपस्थिती झाले नाहीत म्हणून त्यांच्या रजा अद्यापपर्यंत मंजूर करण्यात आल्या नाहीत. कोरोना काळात केवळ मालवाहतूक सुरू होती मात्र त्यावेळी देखील कामगार वर्गाला रजा मंजूर करून घेण्यासाठी कामगार संघटनेला आगार प्रमुखांना विनवणी करावी लागत होती.

आगारातील कार्यशाळा बसेसला दोनवेळा अपघात झाले मात्र आपल्या जवळ वावरणारे यांच्या कमी दंडाची तर कामगार संघटनेत असलेल्या कामगारांवर कडक कारवाई आगार प्रमुख यांच्याकडून झाल्या आहेत. माल वाहतूक करताना चालकासोबत वाहक आवश्यक असताना चालक हा कामगार   संघटनेशी असेल तर त्याच्यासोबत वाहक दिला जात नाही. त्याचवेळी माल वाहतूक करणाऱ्या एसटी गाड्या यांचे टायर कमी व्हीलचे वापरण्यात येत असून अपघात होण्याची शक्यता माहिती असून देखील आगार प्रमुख १०.००.२० या आकाराचे टायर ऐवजी ९.००.२० या आकाराचे टायर वापरलेल्या गाड्या पाठवून वाहतूक करीत आहेत.

कामगारांना भत्त्याची रक्कम नाहीमुंबईत जाऊन माल वाहतूक करणाऱ्या कामगारांना रात्रवस्ती भत्ता आणि रात्रीचे भोजन यासाठी आगाऊ रक्कम दिली जात नाही. कार्यशाळेचे छप्पर पावसाळ्यात गळत असून पाण्याचे थेंब अंगावर घेत कर्मचारी वर्गाला त्याच स्थितीत कामे करावी लागत आहेत.   कर्जत आगार आणि खोपोली स्थानक येथे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना पास देण्यासाठी कायमस्वरूपी कामगार नियुक्ती करण्यात आली नाही. आगारात पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने कामगारांना आपल्या दैनंदिन वापरासाठी पाण्याची टंचाई भासत आहे. या सर्व मागण्यांसाठी कर्जत आगारातील मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटना यांचे प्रतिनिधी यांनी आगार प्रमुख शंकर यादव यांना निवेदने देऊन चर्चा करण्याची मागणी केली आहे. गेल्या आठ महिन्यात आगार प्रमुख हे कामगार संघटनेच्या पदाधिकारी यांना वेळ देत नाहीत. त्यामुळे  ७ एप्रिलपासून महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी हे उपोषणाला बसणार आहेत असा इशारा पेण रामवाडी येथील जिल्हा वाहतूक नियंत्रक यांना दिलेल्या पत्रात देण्यात आला आहे.

आम्ही शासनाच्या आदेशाने काम करीत असून  कामगार संघटनेने प्रशासनाबरोबर एकत्र येऊन काम केले पाहिजे आणि म्हणून आपण कामगार संघटनेशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊन आंदोलन होणार नाही याची काळजी घेऊ -शंकर यादव-आगार प्रमुख

टॅग्स :state transportएसटी