शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सेंट जोसेफ शाळेतील फीवाढ रद्द

By admin | Updated: March 25, 2016 00:37 IST

नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेने केलेली भरमसाट फीवाढ रद्द करण्यासाठी पालकांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात मंगळवारपासून बेमुदत आमरण उपोषण पुकारले होते.

पनवेल : नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेने केलेली भरमसाट फीवाढ रद्द करण्यासाठी पालकांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात मंगळवारपासून बेमुदत आमरण उपोषण पुकारले होते. पालकांनी शाळेच्या गेटच्या बाहेर ठिय्या मांडून फीवाढीचा निषेध केला. पालकांच्या या आंदोलनाला यश आले असून शाळा प्रशासनाने ही फीवाढ रद्द केली. उपोषणात पालकांनी ११ मागण्यांचा उल्लेख केला होता. सर्व विद्यार्थ्यांना सर्वधर्मसमभावाची वागणूक देण्यात यावी, प्रत्येक वर्गात ४० विद्यार्थ्यांचा हजेरीपट असावा व १ वर्गशिक्षिका कायम स्वरु पात असावी, पी. टी.ए. सभासदांची निवड पारदर्शक असावी, शासन नियमाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही जादा फी, अनिवार्य सहलची सक्ती करण्यात येऊ नये, नर्सरी ते दहावीपर्यंत शिक्षण शुल्क समितीची स्थापना करण्यात यावी, शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, सिडको आदेशानुसार शाळेचे मैदान सायंकाळनंतर स्थानिक रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, मुले यांना खुले करण्यात यावे, शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या अहवालाची त्वरित पूर्तता करु न शाळेच्या नोटीस बोर्डवर प्रत लावण्यात यावी, आदी मागण्यांचा यात समावेश आहे. सेंट जोसेफ शाळेच्या मनमानी कारभाराबाबत पालक त्रस्त झाले होते. वारंवार निवेदन देऊन देखील शाळा प्रशासन फी वाढ मागे घ्यायला तयार नसल्यामुळे पालकांनी उपोषण करायचे ठरवले. दरम्यान, यासंदर्भात पालकांनी शालेय शिक्षणमंत्र्यांना निवेदन देवूनही वाढ रद्द करण्याची विनंती केली होती. (प्रतिनिधी)बैठकीत निर्णयरायगड जिल्हा शिक्षणाधिकारी शेषराव बडे, पनवेलचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे, सेंट जोसेफ शाळेचे जॉर्ज, तसेच पालक प्रतिनिधी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत शाळा प्रशासनाने फीवाढ मागे घेतली.