शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

एसटी आगार नव्हे समस्यांचे भांडार, अलिबागमध्ये प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 06:59 IST

 जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असणारे आणि पर्यटकांचे हॉट डेस्टिनेशन म्हणून अलीकडेच अलिबागची ओळख झाली आहे; परंतु अलिबाग येथील प्रमुख एसटी आगाराची प्रचंड दुरवस्था झाली आहे. दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असणाऱ्या आणि दिवसाला लाखो रुपयांनी एसटी महामंडळाची तिजोरी भरणाºया एसटी आगारात सोयी-सुविधांची चांगलीच वानवा असल्याचे दिसून येते.

- आविष्कार देसाईअलिबाग   जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असणारे आणि पर्यटकांचे हॉट डेस्टिनेशन म्हणून अलीकडेच अलिबागची ओळख झाली आहे; परंतु अलिबाग येथील प्रमुख एसटी आगाराची प्रचंड दुरवस्था झाली आहे. दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असणाऱ्या आणि दिवसाला लाखो रुपयांनी एसटी महामंडळाची तिजोरी भरणाºया एसटी आगारात सोयी-सुविधांची चांगलीच वानवा असल्याचे दिसून येते. प्लॅटफार्म तुटलेले आहेत, तर आगाराच्या इमारतीची एवढी दुरवस्था झाली आहे की, ते कधी कोसळेल याचा नेम नाही. वीकेंडला येथे प्रवाशांची मोठ्या संख्येने गर्दी असते. लोकप्रतिनिधींसह प्रशासनानेही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. त्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालाय, जिल्हा पोलीस मुख्यालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हा न्यायालय, जिल्हा परिषद अशी महत्त्वाची सरकारी कार्यालये आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुकास्तरावरील विविध सरकारी आणि निमसरकारी आस्थापना आहेत. विविध माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये, शाळा आहेत. कामानिमित्त जिल्ह्याच्या कानाकोपºयातून येथे मोठ्या संख्येने लोक येत असतात. ग्रामीण भागातून तसेच तालुका ठिकाणाहून येणाºयांसाठी एसटी हे प्रवासाचे महत्त्वपूर्ण आणि सुरक्षित साधन आहे. मोठ्या संख्येने एसटीने प्रवास करणाºयांची संख्या आजही कायम असल्याचे आपल्याला दिसून येते. रायगड जिल्ह्यामध्ये धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, बौद्धकालीन लेण्या त्याचप्रमाणे सुंदर आणि विस्तृत समुद्रकिनारे आहेत. येथील पर्यटन स्थळांचे आकर्षण पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वीकेंडला सुुमारे पाच हजार पर्यटक येथे येत असतात. यातील सर्वच पर्यटक एसटीने प्रवास करणारे नसले तरी, त्यातील ५० टक्के हे एसटीने प्रवास करणारेच असतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने विविध सवलतीच्या प्रवासाचे प्लॅन सुरू केले आहेत. त्यावरून येथे असणारी गर्दी स्पष्ट होते. त्यामुळे हजारोंच्या संख्येने प्रवासी हे येथून ये-जा करीत असतात. त्यांच्यामार्फत एसटी महामंडळाच्या तिजोरीत लाखो रुपये जातात; परंतु अलिबागच्या एसटी आगाराची प्रचंड दुरवस्था झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.१अलिबाग येथील एसटी आगाराची इमारत जीर्ण झाल्यामुळे तेथील छपराला तडे गेले आहेत. त्यामुळे छप्पर कधीही कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळच्या वेळी इमारतीची डागडुजी होत नसल्यामुळे इमारतीची अशी अवस्था झाली आहे, असा आरोप प्रवासी संघटनेने वेळोवेळी केला आहे. इमारतीला रंग दिलेला नसल्याने तिला बकाल स्वरूप आले आहे.२आगाराच्या परिसरामध्ये निर्माण होणाºया कचºयाची विल्हेवाट रोजच्या रोज लावली जात नसल्याने तेथे कचºयाचे ढीग जमा होतात. त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली असते. आगारामध्ये उनाड गुरे-ढोरे, बकºया, भटकी कुत्री यांचे वास्तव्य असल्याने त्यांनी केलेल्या घाणीचाही त्रास होतो. त्याचप्रमाणे हे जागोजागी बसलेले असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.मनोरुग्ण, भिकाºयांमुळे प्रवासी हैराणआगारामध्ये मोठ्या प्रमाणात भिकारी, मनोरुग्ण सातत्याने दिसून येतात. त्यामुळेही प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. भिकारी थेट महिलांच्या पर्सला हात लावून भीक मागतात. याच आगारामध्ये बिनकामाच्या व्यक्ती बसलेल्या दिसून येतात, तर काही प्रवाशांना बसण्याची सोय केलेली आहे, तेथील सिमेंटच्या बाकड्यावर झोपलेलेही असतात. त्यामुळे प्रवाशांना गाडीची वाट पाहताना ताटकळत उभेराहावे लागते.आगार परिसरामध्ये खासगी वाहने पार्किंग करता यावीत, यासाठी तेथे पे अ‍ॅण्ड पार्क सुविधा सुरू केली आहे. मात्र, बहुतांश खासगी वाहने ही एसटी आगाराच्या मुख्य द्वारापाशीच तळ ठोकून उभी असलेली दिसून येतात. त्याच मुख्यद्वारावर पोलीस चौकी आहे; परंतु या सर्व घटनांकडे तेही गांभीर्याने पाहत नसल्याने तेथे दिवसागणिक खासगी वाहनांची गर्दी वाढली आहे.स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही आगारात नसल्याने पाण्यावाचून प्रवाशांचे हाल होतात. पाणी उपलब्ध नसल्याने नाइलाजाने तेथील स्टॉलवरून बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे पाण्यासाठी प्रवाशांच्या खिशाला चाट बसत आहे. लायन्स क्लबने तेथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, तेथील पाणपोई कायमस्वरूपी बंदच असल्याचे दिसून येते.एसटी आगार परिसरामध्ये असणारे स्वच्छतागृह हेही सातत्याने अस्वच्छ असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तेथील दुर्गंधीचा सामना प्रवाशांना करावा लागतो. स्वच्छतागृहाचीही दैना उडाली असल्याने प्रवाशांचीही चांगलीच गैरसोय होत आहे. त्यामध्ये विशेष करून महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.अलिबाग आगारप्रमुख एस.पी.यादव यांच्याशी संपर्क साधला असता ते रजेवर असल्याचे सांगण्यात आले. आगाराच्या दुरवस्थेबाबत रजेवरून आल्यावर बोलू, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड