शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धन-बोर्लीपंचतन रस्ता खचल्याने धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:59 IST

अपघाताची शक्यता; दुरुस्तीची प्रवाशांकडून मागणी

दिघी : श्रीवर्धन तालुक्याला पुणे, मुंबई इतर जिल्ह्याकडे जोडणारा मुख्य रहदारी असणारा रस्ता प्रवासाकरिता धोकादायक ठरत आहे. श्रीवर्धन - बोर्लीपंचतन मार्गावरील आदिवासीवाडीजवळ असलेल्या साकवावरील रस्ता खचला आहे. मात्र, नव्याने बनलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने या खड्ड्यात अपघात होण्याची शक्यता आहे. याची त्वरित दखल घेण्याची मागणी होत आहे.श्रीवर्धन-बोर्लीपंचतन हा सरळ मार्ग १७ कि. मी. अंतराचा आहे. आदिवासीवाडी जवळील रस्ता महिन्यांपूर्वी नव्याने बनला आहे. काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे रस्ता खचला. त्यामुळे येथून वाहने चालवणे धोकादायक बनले आहे. या मार्गावर दररोज शेकडो वाहने प्रवास करत असतात. रस्ता खचलेल्या ठिकाणी कोणताही धोकादर्शक फलक लावलेला नाही. शिवाय खड्ड्यात भरावदेखील टाकला नाही. रोजच वर्दळ असल्याने तसेच उन्हाळ्यात पावसाळ्यात श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा असते. त्यामुळे येथील खड्डे लक्षात न आल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे. जोरदार पावसात हा रस्ता पूर्ण खचण्याची भीती आहे. रस्त्याला खोल खड्डा तयार झाला आहे. समोरून येणारी वाहने खड्ड्यात आदळून एकमेकांवर धडकू नअपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. सध्या रस्त्यावरून भीतिदायक प्रवास करण्याची वेळ आली आहे. मात्र, संबंधित विभाग याकडे लक्ष देत नसल्याने अनर्थ घडू शकतो. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालक संताप व्यक्त करताना दिसत आहेत.या रस्त्याला दोन दिवसांत किरकोळ अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खचलेल्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. रस्ता सरळ असल्याने कार्ले आदिवासीवाडी जवळचा खचलेला भाग लक्षात येत नाही, त्यामुळे येथे दुचाकी अथवा मोठ्या वाहनांचा अपघात होऊ शकतो. सार्वजनिक बांधकाम खात्याने खचलेल्या या भागात भराव टाकावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत असल्याचे रिक्षाचालक प्रवीण वडके यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी श्रीवर्धन येथील बोर्लीपंचतन बांधकाम विभागीय कनिष्ठ अभियंता एस. एम. शेट्टे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा