शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीसदस्यांनी केली साफसफाई

By admin | Updated: December 14, 2015 01:32 IST

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी सबंध महाराष्ट्रासह देशाच्या निवडक महानगरात स्वच्छता अभियान राबविले.

पेण : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी सबंध महाराष्ट्रासह देशाच्या निवडक महानगरात स्वच्छता अभियान राबविले. यावेळी ३००० श्री सदस्यांनी पेणमध्ये स्वच्छता अभियान राबविले.शिस्तीमुळे राष्ट्र मोठे बनते, सहिष्णुता व परस्पर सहकार्यातून राष्ट्रहिताची विधायक कार्ये चुटकीसारखी मार्गी लागतात. राष्ट्राच्या विधायक कार्यात राष्ट्राभिमानी नागरिकांचा सहभाग कसा असावा व त्यांचे मूल्य किती महत्वाचे असते याची खरीखुरी शिकवण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या सामाजिक व सेवाभावी कार्यातूनच मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प केलेल्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी स्वच्छतादूत म्हणून त्यांची निवड केली त्या निवडीतून स्वच्छ महाराष्ट्राचा नवा अध्याय घडला, असे प्रतिपादन पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी केले. पेण शहराच्या चार दिशाच्या परिसरातील १४ किमी परिसरातील रामवाडी बसस्थानक ते पेण खोपोली रोडस्थित विश्वेश्वर स्मशानभूमी, जुना पेट्रोल पंप ते प्रांत कार्यालय, अंतोरा फाटा ते नगर परिषद इमारत, चावडीनाका ते पोलीस ठाणे, हुडको मैदान - कुंभार आळी, गांधी मंदिर ते प्रायव्हेट हायस्कूल पेण बस आगार आदी ठिकाणी १३ बैठकीच्या श्री सदस्यांनी स्वच्छता केली. पेण शहरात सकाळी ७ ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत साफसफाई करण्यात आली. तब्बल २५ टन ओला व ५५ टन सुका कचरा गोळा केला. यासाठी २२ वाहनांची व्यवस्था केली होती व गोळा झालेला सर्व कचरा आंबेघर - धामणी येथील डम्पिंग ग्राऊंडवर नेण्यात आला. कर्जत शहर चकाचककर्जत : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कर्जत नगरपरिषदेच्या सहकार्याने कर्जत शहरात स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत सुमारे तीन हजार श्रीसदस्यांनी ३२ वाहनांच्या सहाय्याने शहराची स्वच्छता केली. स्वच्छता अभियानाचे उद्घाटन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक नितीन सावंत, मुख्याधिकारी दादाराव आटकोरे आदी उपस्थित होते. तालुक्यातील २२ बैठकीचे श्रीसदस्य सहभागी झाले होते. उरणमध्ये स्वच्छता संदेश अभियानचिरनेर : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील सर्वात मोठे स्वच्छता संदेश अभियान राबविण्यात आले. देशातील ८५ पेक्षा जास्त शहरांमध्ये ३ लाखांपेक्षा जास्त दासभक्तांनी या मोहिमेत सहभाग घेतला. उरणमध्ये या अभियानाची सुरूवात आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते करण्यात आली. या स्वच्छता अभियानात नगराध्यक्ष गणेश शिंदे, तहसीलदार नितीन चव्हाण, निवासी नायब तहसीलदार रवींद्र पाटील आदी सहभागी झाले होते.महाडकरांनी केले मोहिमेचे स्वागतमहाड : शहरातील शिवाजी चौक, मुख्य बाजारपेठ, एसटी स्टॅन्ड, छत्रपती शिवाजी मार्ग, भाजी मार्केट, चवदार तळे आदी सार्वजनिक ठिकाणी श्रीसदस्यांनी साफसफाई केली. रविवारी सकाळी ७ वा. सुरुवात झालेल्या या स्वच्छता अभियानामध्ये हजारो श्रीसदस्यांसह, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, विद्यार्थीही सहभागी झाले होते. श्रीसदस्यांच्या स्वच्छता अभियानाचे महाडकरांनी स्वागत केले.माथेरान : माथेरानमध्ये तालुक्यातील असंख्य श्रीसदस्यांनी मिळून संपूर्ण ५२ किलोमीटर परिसरात स्वच्छता अभियान राबविले. सकाळी ७ वाजता या मोहिमेची सुरु वात करण्यात आली. माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या अधिक असल्याने येथील विविध भागात प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, गुटखा पाकीट असा कचरा मोठ्या प्रमाणात गोळा करण्यात आला.