शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

खटला जलदगतीने चालवून आरोपींना फाशी द्या-दरेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रायगड/रोहा : राज्यामध्ये सातत्याने महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. मात्र, याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्करायगड/रोहा : राज्यामध्ये सातत्याने महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. मात्र, याचे सरकारला काहीच पडलेले नाही. रोहा येथील घटना लाजिरवाणी आणि चीड आणणारी आहे. गुन्हेगारांविरोधात जलदगती खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.रोहा तालुक्यातील तांबडी येथे एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी, २६ जुलै रोजी घडली. सोमवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर, सर्व स्तरांतून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. घटनचे पडसाड राज्यात उमटले. मंगळवारी २८ जुलै रोजी विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली. पीडित कुटुंबाच्या बाजूने न्याय मिळावा, यासाठी खटला चालवताना नामांकित वकील दिला जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.पीडित मृत पावलेली मुलगीही कबड्डी आणि कराटे खेळ खेळायची. त्यामुळे तिच्याबाबतीत घडलेल्या घटनेमध्ये एकापेक्षा अधिक आरोपी असण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. याप्रसंगी माजी मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.ग्रामस्थ संतप्तमुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा संशय असल्याने, इतर आरोपींचाही शोध घेऊन पोलिसांनी त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी करीत मुलीचे नातेवाईक, तांबडी ग्रामस्थांनी सोमवारी रोहा पोलीस स्टेशसमोर गर्दी केली. त्याशिवाय पीडित मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पालकमंत्री आदिती तटकरे, खा.सुनील तटकरे यांनी रात्री रोहा तहसीलदार कार्यालयात येऊन समजूत घातली.