शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘कांदळवन’ संरक्षणासाठी कोकणात विशेष योजना, नैसर्गिक आपत्ती प्रतिरोधात महत्त्वपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 04:30 IST

कांदळवनांच्या संरक्षणाबरोबरच किनारी भागातील लोकांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यासाठी ‘कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना’ प्रकल्प सन २०१७-१८ या चालू आर्थिक वर्षापासून राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

- जयंत धुळप अलिबाग : कांदळवनांच्या संरक्षणाबरोबरच किनारी भागातील लोकांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यासाठी ‘कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना’ प्रकल्प सन २०१७-१८ या चालू आर्थिक वर्षापासून राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे आता सार्वजनिक तसेच खासगी जमिनीवर असलेल्या ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील कांदळवनांचे संरक्षण होण्यास मोठी मदत होणार आहे.संयुक्त वन व्यवस्थापनाच्या धर्तीवर कांदळवनांची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यातून उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. या योजनेंतर्गत ज्या गाव व वस्तीच्या क्षेत्रांमध्ये कांदळवने आहेत तेथे सामूहिक स्वरूपाचे फायदे देण्यासाठी व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येईल. सामूहिक स्वरूपांच्या कामासाठी शासनाचा सहभाग ९० टक्के व समितीचा सहभाग १० टक्के राहील. वैयक्तिक लाभार्थ्यांच्या कामासाठी शासनाचा सहभाग ७५ टक्के व लाभार्थीचा सहभाग २५ टक्के राहील. या योजनेंतर्गत खेकडापालन, कालवेपालन,मधुमक्षिकापालन, शिंपले पालन, गृहपर्यटन,शोभिवंत मत्स्य शेती, भातशेती व इतर योजनेद्वारे रोजगार निर्मिती होईल.२०१७-१८ मध्ये या योजनेसाठी १५ कोटी रु पयांची तरतूद करण्यात आली असून पालघर,ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० गावांची निवड होणार आहे. २०१८ ते २०२० या दोन वर्षांच्या कालावधीत कोकणातील नवीन एकूण ७५ गावांत योजना राबविणे प्रस्तावित आहे. या योजनेसाठी राज्य योजनेव्यतिरिक्त जिल्हा योजना, मँग्रोव्ह फाउंडेशन अशा विविध स्रोतातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबंधित जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तसेच नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येत आहे.कांदळवनांचे संरक्षण अत्यावश्यक- देशमुखसागरी उधाणांचा धोका कोकणास मोठ्या प्रमाणात आहे. त्यास आळा घालण्याकरिता कांदळवनांचे बेड(शिल्ड) महत्त्वाचे आहेत. त्याकरिता कांदळवनांनाच स्थानिकांच्या उपजीविकेचे साधन बनवले तर कांदळवन संरक्षण व संवर्धन यशस्वी होवू शकते. त्यामुळे त्सुनामीची तीव्रता कमी करून जनसामान्यांचे प्राण वाचवता येवू शकतात हे सन २००६ च्या त्सुनामीच्या वेळी नागापट्टणम (तामिळनाडू) येथे अनुभवास आले असल्याची माहिती कांदळवनांचा पहिला शास्त्रीय अभ्यास मांडणारे आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय देशमुख यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

टॅग्स :Governmentसरकार