शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

विशेष तहकूब ग्रामसभेत गदारोळ

By admin | Updated: May 6, 2016 01:18 IST

येथील ग्रामपंचायतीची विशेष तहकूब ग्रामसभा बुधवारी (४ मे) ग्रामपंचायतीच्या बच्चूभाई मुकादम सभागृहात सरपंच सोनाली मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मात्र या सभेतही

रेवदंडा : येथील ग्रामपंचायतीची विशेष तहकूब ग्रामसभा बुधवारी (४ मे) ग्रामपंचायतीच्या बच्चूभाई मुकादम सभागृहात सरपंच सोनाली मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मात्र या सभेतही आंग्रेनगरमधील झोपडपट्टीसंदर्भात विषय गाजला. यावेळी सभागृहात गदारोळ झाल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले, त्यानंतर कामकाजाला पुन्हा सुरु वात झाली. सभेच्या कामकाजाला सुरुवात कार्यक्र म पत्रिकेनुसार झाली. ग्रामविकास अधिकारी नरदास ठाकूर यांनी राष्ट्रीय पंचायत दिनाचे महत्व आणि ७३वी घटना दुरुस्तीने पंचायत राज संस्थानमध्ये झालेले बदल याविषयी सविस्तर माहिती सभागृहाला दिली. चौदाव्या वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त निधीच्या खर्चाचे नियोजन ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणे. आमचा गाव आमचा विकास या योजनेत पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनी दुरुस्ती, चौकाचे सुशोभीकरण, पेव्हर ब्लॉक, अंतर्गत रस्त्यावर गटार योजना आदि कामे सुचवणे सुरू असताना सभागृहात गोंधळ सुरू झाला. मुख्य विषय गाजला तो आंग्रेनगरमधील झोपडपट्टीसंदर्भात यावेळी अध्यक्षांनी सभागृहातील चर्चा शांततेत होण्यासाठी एका वेळी एकच व्यक्तीने बोलावे असे आवाहन केले, परंतु गदारोळ सुरू राहिल्याने अखेरीस आठ पोलिसांनी सभागृहाचा ताबा घेतला त्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरूवात झाली. मच्छिमारी बांधवांना समुद्र किनाऱ्यावर रेती व्यवसायामुळे मच्छी वाळत टाकण्यासाठी जागा नाही यासाठी मच्छिमारांना तत्काळ जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. सरपंचांनी यात लक्ष घातले जाईल असे सांगितले. शासकीय पातळीवर आंग्रेनगरला गावठाण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे सभागृहात मागील पत्र वाचनाने लक्ष वेधण्यात आले. (वार्ताहार)