शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची तुरळक गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 23:16 IST

निसर्गसौंदर्याची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरुड तालुक्याला प्रतिवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात.

आगरदांडा : मुरुड तालुक्यातील वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीतील सवतकडा येथील धबधबा पर्यटकांचे व स्थानिकांचे खास आकर्षण ठरत आहेत. राज्य शासनाने ई-पास रद्द केल्यामुळे मुरुडमध्ये तुरळक पर्यटक दिसून येत आहेत. ठाणे व पनवेल येथील पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे.

निसर्गसौंदर्याची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरुड तालुक्याला प्रतिवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. फेसाळणारे धबधबे, धुक्याच्या पाठशिवणीत पावसाची रिपरिप, गार वारा, घाट व डोंगरातून अनेक ठिकाणी पाण्याच्या पडणाºया धारा अशा सगळ्या रोमांचकारी क्षण अनुभवण्यास पर्यटक मुरुडमध्ये येतात, परंतु सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पर्यटनावरबंदी घालण्यात आली होती. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने पर्यटक वस्थानिकनागरिक सवतकडा धबाधब्यावर आनंद घेताना दिसत आहेत.

येथे आलेल्या पर्यटकांना वाहने उभी करण्यापासूनच समस्येला सुरुवात होत आहेत. परिणामी मुरु डच्या विकासासाठी शासनाने विशेष पॅकेजची तरतूद करून निधी उपलब्ध करून द्यावा, येथे येणाºया पर्यटकांच्या सोईसुविधाकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन लक्ष द्यावे, जेणेकरून पर्यटकांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळू शकतो, अशी मागणी श्रीराम जामकर, ओमकार चोडणेकर, ओमकार पोतदार व अंकिता भाटकर यांनी केली आहे.

च्धबाधबावर जाण्यासाठी वावडुंगी गावापासून ३ किलोमीटर अंतर असून, मुरुडपासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. हा रस्ता जंगलातून असल्याने पायपीट करावी लागते. या पर्यटन स्थळांचा सर्व सुविधायुक्त विकास व्हावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून पर्यटनप्रेमींकडून होत आहे. या ठिकाणी पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे.

टॅग्स :Raigadरायगड