शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या घोषाने दुमदुमला पद्मदुर्ग

By admin | Updated: December 28, 2015 02:54 IST

कोकणकडा मित्र मंडळ व मुरुड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर पद्मदुर्ग जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

नांदगाव : कोकणकडा मित्र मंडळ व मुरुड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर पद्मदुर्ग जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवकाळातील पेहराव केलेले असंख्य मावळे ‘शिवाजी महाराज की जय’चा जयघोष करीत ढाली व भाले घेऊन अवतरल्याने वातावरण बदलून शिवरायांचा काळ प्रत्यक्ष जागृत झाल्यासारखा वाटत होता. कार्यक्रमाची सुुरुवात पर्यटन सभापती महेश भगत यांच्या हस्ते गडपूजन करून करण्यात आली. यावेळी कोकणकडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार, दीपक शिंदे, पर्यटन महोत्सव अध्यक्ष नितीन आंबुर्ले, अभिजित सुभेदार, आंबा उत्पादक अध्यक्ष चंद्रकांत मोकल, सचिन करडे, शिक्षण सभापती प्रकाश सरपाटील व असंख्य स्थानिक नागरिक व पर्यटक उपस्थित होते. यावेळी पद्मदुर्ग किल्ल्यावर पारंपरिक गोंधळ, दांडपट्टा तसेच इतर शौर्याचे खेळ करण्यात आले. सर्व उपस्थित मावळ्यांनी पालखी सर्व बुरुजांवर फिरवून इतिहास जागृतीचा प्रयत्न केला. यावेळी म्हसळे येथील सचिन करडे म्हणाले, की प्रत्येक मराठी माणसाने मराठी असल्याचा अभिमान बाळगा. एका मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसास मदत केलीच पाहिजे. दुष्यकृत्य करणाऱ्यांच्या विरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत. मराठी संस्कृती जपून महाराजांच्या आदर्श तत्त्वांवरून चालल्यास एक नवीन सुराज्य होण्यास वेळ लागणार नाही. प्राथमिक शिक्षक व इतिहास अभ्यासक सुग्रीव चव्हाण यांनी पद्मदुर्ग किल्ल्याचा इतिहास सांगितला. (वार्ताहर)