शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सोनालीच्या कुटुंबीयांची प्रकल्प अधिका-यांनी घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 02:57 IST

कर्जत : कर्जत तालुक्यातील मोरेवाडी या आदिवासीवाडीतील १८ महिन्यांच्या सोनालीचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची घटना नुकतीच येथे घडली.

कर्जत : कर्जत तालुक्यातील मोरेवाडी या आदिवासीवाडीतील १८ महिन्यांच्या सोनालीचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची घटना नुकतीच येथे घडली. याबाबत माहिती घेण्यासाठी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय पेणचे प्रकल्प अधिकारी गजेंद्र केंद्रे यांनी मंगळवारी सकाळी सोनालीच्या कुटुंबीयांची भेट घेतली.भेटीदरम्यान त्यांनी अंगणवाडीमार्फत दिल्या जाणाºया आहाराबाबत चौकशी केली. याच वाडीत आणखी तीन मुले सॅम श्रेणीतील तर दोन मुले मॅम श्रेणीतील आहेत. या मुलांची योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सदर अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त आहे, व्हिजिट बुक उपलब्ध नाही, मागील महिन्यापासून डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार बंद आहे, अर्धवट बांधकामामुळे अंगणवाडी मदतनिसाच्या घरीच भरवली जाते. या इतरही समस्या समजून घेत या वेळीच सुधारण्याच्या सूचना त्यांनी बालविकास विभागाच्या निशिगंधा भवार यांना दिल्या.सोनालीचा मृत्यू कुपोषणाने नाहीतर दुसºया आजाराने झाल्याचे बालविकास विभागाच्या कर्मचाºयांचे म्हणणे होते. सोनालीच्या आईने सांगितले की, माझी मुलगी कुपोषितच होती, तिला अंगणवाडीतून खाऊसुद्धा दिला जात होता. डिसेंबर २०१६मध्ये कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सुरू केलेल्या बाल उपचार केंद्रात उपचारसुद्धा घेतले होते.सोनालीच्या मृत्यूसाठी आरोग्य विभाग व बालविकास विभागच जबाबदार असल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.दरम्यान, शबरी घरकूल योजनेतून या कुटुंबाला पक्के घर आणि घरगुती उद्योगासाठी कर्ज देऊ, असे आश्वासन प्रकल्प अधिकारी केंद्रे यांनी दिले. या वेळी सहायक प्रकल्प अधिकारी पवार, एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या निशिगंधा भवार, दिशा केंद्राचे अशोक जंगले, रवि भोई, स्थानिक लक्ष्मण दरवडा, रवि दरवडा आदी उपस्थित होते.