शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कोणी नदी, कोणी तलाव, कोणी समुद्र किनाऱ्यावर बुडाले; महिन्यात १३ मृत्यू

By निखिल म्हात्रे | Updated: June 30, 2024 15:24 IST

जिल्ह्यात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : पावसाळा सुरू झाल्यापासून रायगड जिल्ह्यात गेल्या एका महिन्यात सात अल्पवयीन मुलांसह १३ जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये सात पर्यटकांचा समावेश आहे. या घटनांमुळे जिल्ह्यात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

अलिबाग तालुक्यातील मुनवली गावात २३ जून रोजी दोन किशोरवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला, तर २२ जून रोजी दादली गावातील २१ वर्षीय तरुणाचा सावित्री नदीत पाय घसरून बुडाल्याने मृत्यू झाला. त्याच दिवशी काल नदीत पोहताना ३२ वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. खालापूर तालुक्यातील पोखरवाडी धरणात २१ जून रोजी मुंबईतील १७ ते २६ वयोगटातील चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अलिबाग समुद्रात पोहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. अशाच एका २७ वर्षांच्या तरुणचा १३ जून रोजी समुद्रात बुडून मृत्यू झाला.

उरण तालुक्यातील पिरकोन गावात ९ जून रोजी हृदयद्रावक घटनेत २५ वर्षीय महिला आणि तिच्या ७ वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही महिला तलावात कपडे धुवत असताना ही घटना घडली होती. या आधी २८ मे रोजी मुंबईतील एका व्यक्तीचा काशीद समुद्रकिनारी समुद्रात बुडून मृत्यू झाला, तर २५ मे रोजी भिरा गावात एका पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. पोहण्यासाठी गेलेल्या १३ जणांना गेल्या महिनाभरात जीव गमवावा लागला. अतिउत्साहीपणा न करता पाण्याचा अंदाज घेऊन नागरिकांनी पोहण्यासाठी उतरावे. पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक

पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुर्घटना होत आहेत. समुद्रावर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. अनेकांना समुद्राच्या उधाणाचा अंदाज येत नाही. पोहण्यासाठी जाण्याआगोदर त्या स्थळाविषयीची माहिती आवर्जून घ्यावी.- मंदार पावशे, नागरीक

टॅग्स :Raigadरायगड