शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नौदल तळावर सौरऊर्जा प्रकल्प; ई-उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 23:41 IST

करंजा येथे दोन मेगावॅट क्षमतेची वीजनिर्मिती

उरण : वीजपुरवठ्यासाठी वीज कंपन्यांवर अवलंबून राहण्याऐवजी सौरऊर्जेचा स्रोत निर्माण करून आत्मनिर्भर होण्याची तयारी भारतीय नौदलाने सुरू केली आहे. याची सुरुवात म्हणून उरण येथील करंजा नौदल तळावर संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दोन मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जेवर चालणाऱ्या वीजनिर्मितीच्या प्रकल्पाची उभारणी करण्यात यश मिळविले आहे. करंजा येथील नौदल तळावर उभारण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी सौरऊर्जा प्रकल्पाचे ई-उद्घाटन नुकतेच भारतीय नौदलाचे व्हाइस अ‍ॅडमिरल अजित कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

उरण परिसरात करंजा येथील नौदल तळावर दोन मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या सौरऊर्जेच्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. विशेष म्हणजे सूर्यप्रकाशावर आधारित असलेल्या सौर पॅनेलची रचना सूर्याच्या बदलत्या दिशेप्रमाणे फिरण्यासाठी केली आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

सौरऊर्जेवर आधारित असलेला हा प्रकल्प देशातील सर्वात मोठ्या सौर संयंत्रांपैकी एक आहे. सोलर प्लांटमध्ये शतप्रतिशत स्वदेशी विकसित सौर पॅनेल, ट्रॅकिंग टेबल्स आणि इन्व्हर्टर आहेत. कॉम्प्युटराइज्ड मॉनिटरिंग व कंट्रोलसह सिंगल अ‍ॅक्सिस सन ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर करून हे ग्रीड आणि सौरऊर्जा पॅनेल संगणकीय प्रणालीशी जोडण्यात आले आहेत.

स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर

रऊर्जेवर आधारित हा प्रकल्प नौदल तळाच्या वीजपुरवठ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, तसेच हा प्रकल्प सौर व अक्षय ऊर्जेचा वापर करण्याच्या दिशेने भारतीय नौदलाचे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. च्विजेची संपूर्णपणे गरज भागवून विजेची आणि पैशाची मोठ्या प्रमाणावर बचत करणारे स्वदेशी बनावटीचे सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प देशभरातील असलेल्या नौदल तळावरही उभारण्यात येणार असल्याची माहिती व्हाइस अ‍ॅडमिरल अजित कुमार यांनी उद्घाटनप्रसंगी दिली.