कर्जत : तालुक्यातील सोलणपाडा धरण पावसाच्या पाण्यामुळे ओसंडून वाहत आहे. तेथील सुरक्षित असलेला सांडवा आणि त्याखाली कोसळणाऱ्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी सध्या शेकडो पर्यटक गर्दी करीत आहेत.सोलणपाडा जामरुंग येथील धरण हे कर्जत शहरापासून तब्बल ३० किलोमीटर अंतरावर आहे. मात्र काही वर्षांपूर्वी नव्याने दुरु स्ती करून तयार करण्यात आलेला मातीचा मुख्य बांध आणि सिमेंट काँक्र ीटने बनविलेल्या सांडव्यामुळे धरणाचा परिसर आणखी सुरक्षित झाला आहे. धरणातील पाणी सांडव्यामधून खाली शेतीला जात असलेल्या वाटेमध्ये मोठा पाणी साठवण तलाव देखील बांधला आहे. तेथे वर्षा सहलीची मजा लुटण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करीत आहेत. शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी तर ४०० ते ५०० लोकांची गर्दी होत असते. इतर दिवशी किमान १०० पर्यटक वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. निसर्गरम्य वातावरण तसेच समोर पुणे जिल्ह्याची आठवण करून देणारे मोठे डोंगर त्याचवेळी भीमाशंकरच्या पाऊलखुणा यांचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करीत आहेत. (वार्ताहर) कसे जाल : कर्जत या तालुक्याच्या ठिकाणापासून दूर वर असलेल्या सोलणपाडा धरणावर जाण्यासाठी कर्जत येथून जामरु ंग एसटी पकडून जाता येते. आपली वाहने घेवून आल्यास कर्जत-मुरबाड रस्त्याने कशेळे येथून जामरु ंग गावाकडे जाणारा रस्ता निघतो. जामरु ंग, हिरेवाडी आणि सोलणपाडा येथे घरगुती जेवण देखील मिळते. हा परिसर निसर्गरम्य असून पावसामुळे त्याच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे.
कर्जतमधील सोलणपाडा धरण ओसंडून वाहू लागले
By admin | Updated: July 30, 2015 23:43 IST