शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सहा लाख रहिवासी वाऱ्यावर

By admin | Updated: September 25, 2015 02:24 IST

सिडकोेने पनवेल तालुक्यातील खारघर ते तळोजापर्यंतचा परिसर विकसित केला. या ठिकाणी ६ लाख पेक्षा जास्त नागरिक राहण्यासाठी आले आहेत.

वैभव गायकर, पनवेलसिडकोेने पनवेल तालुक्यातील खारघर ते तळोजापर्यंतचा परिसर विकसित केला. या ठिकाणी ६ लाख पेक्षा जास्त नागरिक राहण्यासाठी आले आहेत. परंतु या नागरिकांना अत्यावश्यक सुविधा देण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. उद्यान, मैदान, मार्केट, बसडेपो, रिक्षा स्टँड, समाजमंदिर यासारख्या सुविधाही नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होवू लागली आहे. मुंबईवरील लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी शासनाने ठाणे, पनवेल व उरण तालुक्यामधील ९५ गावांमधील जमीन संपादित केली. प्रकल्पग्रस्तांची १७ हजार हेक्टर जमीन ताब्यात घेवून त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर वसविण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली. सिडकोने पहिल्यांदा बेलापूर ते ऐरोलीपर्यंतचा परिसर विकसित केला. तेथे प्रत्येक सेक्टरमध्ये उद्यान, मैदान, मार्केट,समाजमंदिर, शाळा यासाठी भूखंड राखून ठेवले. परंतु पनवेल तालुक्याचा विकास करताना मात्र नियोजनामध्ये प्रचंड त्रुटी ठेवल्या आहेत. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकमत कार्यालयास भेट दिली असताना या परिसरातील प्रश्नांवर लक्ष वेधले. खारघर, तळोजा, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, करंजाडे व उलवे परिसराचा विकास करण्यात आला आहे. मूळ गावठाण व विकसित नोडची लोकसंख्या ६ लाखपेक्षा जास्त झाली आहे. सिडकोने नागरिकांना भरमसाट आश्वासने दिली होती. परंतु त्यांची पूर्तता करण्यात आली नाही. सिडकोने सेक्टरनिहाय चांगले मैदान व उद्यान विकसित केलेले नाही. एकही सुनियोजित मार्केट बांधलेले नाही. खारघर ते पनवेलपर्यंत फक्त एकच बस डेपो आहे. रेल्वे स्टेशन वगळता इतर ठिकाणी नियोजित रिक्षा व टॅक्सी स्टँडही नाही. सिडकोने नागरिकांच्या करमणुकीसाठी तालुक्यामध्ये एकही नाट्यगृह उभारलेले नाही. वाहनतळासाठी जागा ठेवलेली नाही. समाजमंदिरांचा अभाव आहे. धार्मिक स्थळांसाठी जागा नाही. या परिसरात ६ लाखपेक्षा जास्त नागरिक रहात आहेत.