शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मासळीचे प्रमाण घटल्याने महत्त्वाचे मासे झाले दुर्मीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:42 IST

Murud : २०२० हे वर्ष मच्छीमारांना खूप संकटाचे गेले असून, अवकाळी पाऊस व निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका सहन करावा लागल्याने, मोठ्या आर्थिक संकटात कोळी समाज सापडला आहे.

मुरुड : संपूर्ण कोकणाला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे, तर रायगड जिल्ह्याला २४० किलोमीटरचा समुद्रकिनारा असून, किनाऱ्यावर राहणाऱ्या कोळी समाजाचा प्रमुख व्यवसाय हा मासेमारीवर अवलंबून आहे. देशाला परकीय चलन मिळवून देऊन आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची पत सुधारण्याचे महत्त्वपूर्ण कामगिरी मच्छीमार करतात. मात्र, हे मच्छीमार मासळीचे प्रमाण घटल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत.२०२० हे वर्ष मच्छीमारांना खूप संकटाचे गेले असून, अवकाळी पाऊस व निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका सहन करावा लागल्याने, मोठ्या आर्थिक संकटात कोळी समाज सापडला आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीर्वर्धन, मुरुड, उरण, अलिबाग या महत्त्वाच्या तालुक्यात मच्छीमारांचा सर्वात मोठा व्यवसाय चालतो. येथील सर्व मासळी जिल्ह्याच्या अन्य भागात पोहोचून मासळीची कमतरता दूर केली जाते. रायगड जिल्हा हा पर्यटन क्षेत्र असल्याने येथे वर्षाला लाखो पर्यटक भेट देत असतात. अशा वेळी पर्यटकांना आवडणारी मासळी येथे मुबलक प्रमाणात मिळत असते, परंतु गेल्या काही दिवसापासून मासळी बाजारात मासळीचे प्रमाण घटल्याने मोठा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पापलेट, घोळ, रावस, सुरमय, हलवा, फिलसा ही मासळी दिसेनासी झाली आहे. फक्त तुरळक मासळीच बाजारात येत असल्याने पर्यटक व स्थानिक नागरिक यांची हिरमोड होताना दिसत आहे.समुद्रात जेली फिश जास्त सापडू लागल्याने मच्छीमारांना मासळी मिळेनाशी झाली आहे. अचानकपणे गेल्या काही दिवसांपासून मासळीचे प्रमाण घटले आहे. 

खोल समुद्रातही मासळी नाही या परिस्थितीबाबत काही मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलो, तरी पुरेशी मासळी मिळत नाही. मासळीसाठी टाकलेल्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात जेली फिश मिळत आहे, डिझेलचा खर्च परवडत नाही, त्यामुळे आमच्यावर कर्जाचा बोजा वाढत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसापासून मासळी मिळेनाशी झाली आहे. ही परिस्थती रायगड जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आहे. हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. जेली फिश मोठ्या प्रमाणात खोल समुद्रात सापडत आहे. त्यामुळेही मासळी खूप दूर निघून गेली आहे. सध्या डिझेलचे दर खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे खोल समुद्रात मच्छीमारी करणे आता मच्छीमारांना खूप कठीण जात आहे. वाढत्या डिझेलच्या दरामुळे लहान व माध्यम स्वरूपाच्या बोटींना हा खर्च परवडेनासा झाला आहे.- मनोहर बैले, उपाध्यक्ष, रायगड जिल्हा मच्छीमार संघ

टॅग्स :Raigadरायगड