शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळासाठी पालिकेची जागा सिडकोकडे वर्ग

By admin | Updated: September 24, 2015 00:24 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता शासकीय जमीन सिडकोने या अगोदरच घेतली आहे. त्याचबरोबर पनवेल नगरपालिकेच्या मालकीच्या कोपर येथील जमिनीचा सातबारा सुध्दा सिडकोच्या नावावर झाला आहे

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता शासकीय जमीन सिडकोने या अगोदरच घेतली आहे. त्याचबरोबर पनवेल नगरपालिकेच्या मालकीच्या कोपर येथील जमिनीचा सातबारा सुध्दा सिडकोच्या नावावर झाला आहे. मात्र त्या बदल्यात पालिकेला अद्याप सिडकोने जमीन दिली नसून याबाबत प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे मंगळवारी नगराध्यक्षांसह गेलेल्या शिष्टमंडळाने याबाबत सिडको अधिकाऱ्यांना जाब विचारला. याबाबत लवकरच निर्णय घेवू, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. कोपर येथे पनवेल नगरपालिकेने १९६० ला गटार योजनेकरिता ३२ एकर जागा संपादित केली होती. या ठिकाणी योजना काही प्रमाणात उभारण्यातही आली होती मात्र ती जास्त काळ चालू शकली नाही. त्यामुळे ही जमीन मिळावी याकरिता सिडको गेल्या अनेक वर्र्षांपासून प्रयत्न करीत आहे. सिडकोने या अगोदर पनवेल नगरपालिकेभोवती मोठ्या प्रमाणात जमीन संपादित केली. पालिकेची हद्द असलेले नवीनपनवेल, खांदा वसाहतही महामंडळाच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे पालिकेकडे आता जागाच शिल्लक राहिलेली नाही या कारणाने विकास कामे करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. पनवेल शहर त्याचबरोबर सिडकोच्या जागेत असलेल्या झोपडपट्ट्या हटविण्याकरिता त्याचे पुनर्वसन करणे क्र मप्राप्त आहे. याची पूर्णत: जबाबदारी पनवेल नगरपालिका घेत असून फक्त जागा सिडकोने द्यायची आहे. मात्र सिडकोने जागा पालिकेकडे हस्तांतरित केली नाही. तक्का येथे भूखंड सिडकोने फक्त देवू केला आहे प्रत्यक्षात कृती शून्य आहे. या संदर्भात वारंवार बैठका झाल्या मात्र सिडकोकडून फक्त आश्वासनांची खैरात करण्यात आली. कोपर येथे जागा देण्यास पालिकेने सातत्याने विरोध दर्शवला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात आदेश पारित करीत ही जागा विमानतळाकरिता देण्याचे आदेश पालिकेला दिले. मात्र सिडकोने या आदेशाला हरताळ फासला असून चालढकल सुरू आहे. (वार्ताहर)