शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धनच्या दोन गावांची पर्यावरणासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:38 IST

प्लॅस्टिकमुक्त गाव करण्याची घोषणा : दिवेआगर, नागलोलीत उपक्रम

दिघी : प्लॅस्टिक हे पर्यावरणावर विघातक परिणाम करत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ºहास थांबवण्यासाठी व प्लॅस्टिकमुक्त गाव करण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर व नागलोली या गावांमध्ये विशेष उपक्रम राबविण्यात आले.दिवेआगर गावाला निसर्गसौंदर्य लाभले आहे. अस्वच्छतेचा आपल्या पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये याचा विचार करण्यात आला. समुद्रकिनाऱ्यावर होणारा प्लॅस्टिक व इतर कचरा त्यामुळे होणारी अस्वच्छता हे पर्यावरणासाठी धोकादायक बाब ठरत आहे. त्यातूनच गणेशोत्सवामध्ये संपूर्ण पंचक्रोशीतून समुद्रात विसर्जन करण्यासाठी येणाºया गणेशमूर्तींमध्ये ८० टक्के मूर्ती या प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या असतात. त्याचे पाण्यात लगेच विघटन होत नाही त्यामुळे विसर्जनानंतर या मूर्तींचे अवशेष व निर्माल्य भरतीच्या पाण्याबरोबर किनाºयावर येऊन सगळीकडे अस्वच्छता पसरलेली असते. या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून दिवेआगर ग्रामपंचायतीने घेतलेल्या विशेष सभेमध्ये पुढील गणेशोत्सवात प्लॅस्टर आॅफ पॅरिस गणेशमूर्तींना दिवेआगर समुद्रकिनारी विसर्जन करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसा ठरावसुद्धा मंजूर करण्यात आला आहे व स्थानिक मूर्तिकारांना प्लॅस्टर आॅफ पॅरिसऐवजी पाण्यात लगेच विघटन होणाºयाच शाडूच्या मातीच्या मूर्ती तयार करण्यासंबंधी लेखी पत्र देण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला. या विशेष सभेला सरपंच उदय बापट, माजी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक शंकर मयेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.प्लॅस्टिकची विल्हेवाट योग्य प्रकारे लावा-सरपंचश्रीवर्धन तालुक्यातील दुर्गम भागातील सात वाडी मिळून वसलेल्या नागलोली ग्रुपग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत उपस्थित ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती नागलोली यांनी प्लॅस्टिकमुक्त गाव करण्यासाठी पुढाकार घेतला.आपण प्लॅस्टिक आपल्या घरी किंवा परिसरात वापरत असतो. त्याचे दुष्परिणाम माहीत असूनही घरी आणलेले प्लॅस्टिक परिसरात टाकत असतो. या वेळी सर्वानुमते निश्चय करण्यात आला. प्लॅस्टिकमुक्त गाव करण्याची जबाबदारी घेण्यात आली.आपल्या घरी आणलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट आपण कुठेही न फेकताकशी लावू शकतो यासाठी ग्रामस्थांनाव शाळकरी मुले या सर्वांना याचेमहत्त्व सरपंच विजय पाडावे यांनी पटवून दिले. या उपक्रमात नागलोली परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.