शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
4
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
5
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
6
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
7
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
8
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
9
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
10
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
11
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
12
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
13
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
14
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
15
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
16
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
17
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
18
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
19
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'

घनकचरा व्यवस्थापनात घोळ, श्रीवर्धनमध्ये नागरिकांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 4:45 AM

श्रीवर्धन नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पुन्हा एकदा पेटला आहे. कचऱ्यापासून खतनिर्मिती होत नसताना ठेकेदार कंपनीला लाखो रु पयांचे बिल अदा करण्यात आले आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : श्रीवर्धन नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पुन्हा एकदा पेटला आहे. कचऱ्यापासून खतनिर्मिती होत नसताना ठेकेदार कंपनीला लाखो रु पयांचे बिल अदा करण्यात आले आहे. सत्ताधारी आणि नगरपालिका प्रशासन नागरिकांची दिशाभूल करून आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे.श्रीवर्धनमध्ये शहरीकरण वाढत असल्याने घनकचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी नगर पालिका प्रशासनामार्फत तेथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यात आला. २०१४ मध्ये तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. कोकणातील पहिला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असल्याने चांगलीच वाहवा झाली. मात्र २०१४ पासून प्रकल्पातून खतनिर्मिती झाली नसल्याचा आरोप श्रीवर्धनकर यांनी निवेदनात केला आहे. जुन्या यंत्रसामग्रीला रंगरंगोटी करून प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आल्याची तक्रार त्यांनी केलीआहे.शेड, विहीर, कामगार वसतिगृह, संरक्षक भिंतीचे काम पूर्ण केल्यानंतर या प्रकल्पाचे पुन्हा उद्घाटन विद्यमान नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांनी ३ जुलै २०१७ रोजी केले.खतनिर्मिती करण्यासाठी सद्गुरु बहुउद्देशीय संस्थेला तब्बल ६४ लाख ८० हजार रु पयांचा ठेका मंजूर करण्यात आला. अद्यापही प्रकल्पातून खतनिर्मिती झालेली नाही तरी ठेकेदार संस्थेला १३ लाख रु पयांचे बिल अदा करण्यात आल्याकडे श्रीवर्धनकर यांनी लक्ष वेधले.शहरामधील कचरा गेल्या वर्षभरापासून जाळण्याचा प्रकारही केला जात आहे. यातील गंभीर बाब म्हणजे शहरातील कचरा शहराबाहेरील खासगी जागेमध्ये टाकून त्यावर मातीचा भराव करण्यात येतो. याबाबत विचारणा केली असता, निकामी कचरा टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जनतेच्या पैशाची लूट करणाºयांवर तातडीने कारवाई करु न फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा शिवसेना जनआंदोलन उभारेल असा इशारा श्रीवर्धन नगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम श्रीवर्धनकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी निवेदन स्वीकारले.ज्या कचºयापासून खतनिर्मिती होऊ शकत नाही तोच कचरा डंप केला जातोय. त्याचप्रमाणे कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी तो पेटवलाही जात नाही. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून खतनिर्मिती केली जाते त्याचा रेकॉर्डही आहे.- अर्चना दिवे, मुख्याधिकारी,श्रीवर्धन नगरपालिका

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या