शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

श्रीवर्धन, म्हसळा, तळा तालुक्यांत सात वर्षांत आमसभा नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:07 IST

नियमांचे उल्लंघन : पंचायतराज समितीच्या शिफारसींना पंचायत समितीने नाकारले

अरुण जंगम ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हसळा : श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील श्रीवर्धन, म्हसळा, तळा तालुक्यांत मागील सात वर्षांत आमसभा झाली नाही. पंचायत समितीच्या माध्यमातून पंचायतराज समितीच्या शिफारसीनुसार दरवर्षी आमसभा घेतली जावी, असे संकेत आहेत. या तीनही गटविकास अधिकाऱ्यांनी या संकेतवजा नियमांचे उल्लंघन केले, असे विरोधकांचे म्हणणे आहे. तालुक्याची आमसभा पंचायत समितीच्या गटविकास आधिकाऱ्यांनी व जिल्ह्याची आमसभा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी पालकमंत्र्यांबरोबर सुसंवाद साधून लावावी, असे म्हणणे आहे.

पंचायतराज समितीने १९७६-१९७७ च्या आठव्या अहवालातील शिफारशीनुसार ९ मे १९७८ रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना आर्थिक वर्षाची सुरुवात होण्याअगोदर प्रत्येक स्तरावर आमसभा घ्याव्यात, असे बंधनकारक केले आहे. या सभांमध्ये कोणते विषय चर्चेला घ्यावेत, या संदर्भात संसद सदस्य, विधानसभा सदस्य व अन्य लोकप्रतिनिधींकडून सूचना मागवून घ्याव्यात व त्या अनुषंगाने सभेचे कामकाज करावे, अशी शासनाची अपेक्षा आहे. पंचायत समितीची आमसभा जिल्हा परिषदेच्या आमसभेपूर्वी एक महिनाअगोदर घ्यावी. त्यात जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील झालेले निर्णय व लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना जिल्हा परिषदेकडे कळवाव्या, जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यातून पंचायत समितीच्या आमसभेतून आलेल्या सूचनांचा आभ्यास करून जिल्हा परिषदेने पुढील वर्षाचा कार्यक्रम निश्चित करावा, असे या मागील पंचायतराज समितीचे धोरण असताना श्रीवर्धन, म्हसळा व तळा या तीनही गटविकास अधिकाºयांनी पंचायतराज आदेशाचे पालनच केले नसल्याचे दिसते.

तालुक्यातील विविध विकासकामाचे प्रस्ताव अभ्यासूपणे आमसभेत पारित करून त्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून निधीची व्यवस्था करून जनहिताची कामे होत असतात, यासाठी विकासकामांचा व त्यावर खर्ची घातलेल्या निधीचा माहितीचा बोर्ड लावणे, कामावर दक्षता समितीची नेमणूक करणे, कामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आमसभेपुढे पुरावे सादर करणे नागरिकांचे कर्तव्य आहे, त्यामुळे विकासकामात पारदर्शकता येते. यासाठी ग्रामसभा, आमसभांचे आयोजन वेळेवर होणे महत्त्वाचे असते.

या पूर्वीची तळा पंचायत समितीची आमसभा २ डिसेंबर २०१२ ला आणि श्रीवर्धन व म्हसळा पंचायत समितीची आमसभा ३ डिसेंबर २०१२ ला झाली होती. मागील सात वर्षांत आमसभा झाली नाही हे धक्कादायक वास्तव पुढे येत आहे.