शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावरील धूपप्रतिबंधक बंधा-याचे ढासळतेय बांधकाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 00:19 IST

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन सदैव पर्यटकांनी गजबजलेले असते.

- संतोष सापते श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन सदैव पर्यटकांनी गजबजलेले असते. पर्यटनातून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. श्रीवर्धन तालुक्याला धार्मिक व ऐतिहासिक पार्श्वभूमीसोबत निसर्गाचे वरदान आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून नव्हे तर देशातील विविध राज्यातून पर्यटक श्रीवर्धनमध्ये हजेरी लावतात. श्रीवर्धनचा नयनरम्य समुद्रकिनारा सर्वांना साद घालत असतो. मात्र येथील समुद्रकिनाºयाची दुरवस्था झाली आहे. या समुद्रकिनाºयावरील धूपप्रतिबंधक बंधारा चालू वर्षात जोरदार झालेल्या पावसामुळे ढासळला आहे. मात्र याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.समुद्रालगतच्या पायºया लाटांच्या फटक्यामुळे उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेक पायऱ्यांचे कठडे तुटले आहेत. फरशा तुटून पडल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटकांच्या दृष्टीने सदरची बाब धोकादायक ठरू शकते. पावसाळ्यात भरती व ओहोटी प्रसंगी समुद्राचे पाणी किनाºयाच्या जवळ येते. अनावधानाने नवख्या पर्यटकास पायºया तुटलेल्या समजले नाही तर अनर्थ होऊ शकतो. २००९ मध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते धूपप्रतिबंधक बंधारा व समुद्रकिनारा सुशोभीकरण याचे भूमिपूजन झाले होते. त्यासाठी १४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. २०१४ मध्ये काम पूर्णत्वास गेले होते. जवळपास दीड किलोमीटरचा समुद्रकिनारा श्रीवर्धनला लाभला आहे. समुद्रकिनाºयावर आसने बसवणे, विद्युत रोषणाई करणे, फरशी बसवणे अशा विविध कामांचा समावेश करण्यात आला होता. जेणेकरून समुद्र किनाºयावर पर्यटकांच्या संख्येत वाढ व्हावी हा हेतू होता. या सुशोभीकरण व धूपप्रतिबंधक बंधाºयास अवघे पाच वर्षे पूर्ण झालेले नाही तरी सुद्धा समुद्र किनाºयाला अवकळा आली आहे.रोषणाई केलेले दिवे व खांब मोडकळीस आले आहेत. किनाºयावर केलेल्या आसन व्यवस्थेतील आसने तुटली आहेत, अनेक ठिकाणी फरशी निघाली आहे. जवळपास सगळ्याच खांबांना गंज चढला आहे. धूपप्रतिबंधक बंधाºयास अनेक ठिकाणी क्षती पोहचली आहे.जीवरक्षकासाठी तयार केलेली टेहळणीची शेड ( कमान ) याचे पत्रे सुद्धा तुटले आहेत. त्यामुळे वेळीच मेरिटाइड बोर्ड व नगरपालिका प्रशासनाने योग्य ती दक्षता घेणे अगत्याचे आहे. संबंधित विषयी मेरिटाइड बोर्डाच्या अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.>समुद्राच्या जोरदार लाटांमुळे प्रत्येक वर्षी समुद्राच्या किनाºयावरील पायºया तुटतात त्यामुळे प्रत्येक वर्षी त्याचे नूतनीकरण केले जाते. या वर्षी तुटलेल्या पायºयाचे तात्काळ नूतनीकरण करू पर्यटन वाढीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.- नरेंद्र भुसाने, नगराध्यक्ष, श्रीवर्धन>समुद्राच्या खाºया पाण्यामुळे सुशोभीकरणास अवकळा आली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी जवळपास १ कोटी ४० लाख रुपये निधीची गरज आहे. त्या अनुषंगाने खासदार सुनील तटकरे यांच्याकडे मागणीचा पाठपुरावा करत आहोत. आजमितीस नगरपालिकेकडे निधीची कमतरता आहे. येणाºया पर्यटकांवर समुद्रकिनाºयावर भ्रमंती व इतर बाबींसाठी कर आकारणी करणे गरजेचे आहे.- वसंत यादव, पर्यटन सभापती, श्रीवर्धन नगरपरिषद>समुद्रकिनारा व धूपप्रतिबंधक बंधारा याचे दायित्व मेरिटाइम बोर्डाचे असते. नगरपरिषदेने समुद्रकिनारा सुशोभीकरणासाठी खर्च करणे अयोग्य आहे. या नूतनीकरणातून नगरपरिषदेला आर्थिक फायदा होत नाही. नगरपरिषदेच्या उत्पन्नाच्या स्रोतात वाढ करणे आवश्यक आहे.- प्रीतम श्रीवर्धनकर, विरोधी पक्षनेते, श्रीवर्धन नगरपरिषदश्रीवर्धनमध्ये पर्यटक समुद्र किनारा बघण्यासाठी येतात. त्यामुळे समुद्र किनाºयाचे सुशोभीकरण असणे आवश्यक आहे. त्याच सोबत पर्यटन विकासासाठी सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे आहे.- प्रसाद विचारे,व्यावसायिक, श्रीवर्धन>धूपप्रतिबंधक बंधाºयाचे काम पतन व फिशरी विभागाचे आहे. यापूर्वी मेरिटाइम बोर्ड हे काम करत होते. आता मेरिटाइम बोर्डकडे धूपप्रतिबंधक बंधाºयाचे काम नाही.- प्रकाश गुंजाळ,बंदर अधिकारी, श्रीवर्धनधूपप्रतिबंधक बंधारा व फिशरी विभाग यांचा काही संबंध नाही. धूपप्रतिबंधक बंधाºयाचे काम पतन विभाग बघते आपण त्यांच्याशी संपर्क साधा.- सुरेंद्र गावडे,फिशरी अधिकारी, श्रीवर्धनश्रीवर्धन समुद्रकिनाºयावरील धूपप्रतिबंधक बंधारा सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला आहे, आता त्याच्या दुरु स्तीसाठी मागणी झाल्यास अंदाज पत्रक तयार करून पाठवले जाईल- विजय जावीर,पतन अधिकारी, श्रीवर्धन