शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बंधा-यांच्या दुरुस्तीचे काम दुस-या दिवशीही सुरू, 300 शेतक-यांचे श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 03:04 IST

शुक्रवारी सूर्य उगवला आणि शहापूर-धेरंडमधील प्रत्येक घरातील एक स्त्री वा पुरुष शेतकरी आपल्या घरचे फावडे, कुदळ, घमेले आणि दुपारच्या जेवणासाठी भाजी-भाकरी सोबत घेऊन गावांच्या किनारी भागातील फुटलेल्या संरक्षक बंधा-यांच्या दुरुस्तीकरिता श्रमदान करण्याकरिता निघाले होते.

अलिबाग : शुक्रवारी सूर्य उगवला आणि शहापूर-धेरंडमधील प्रत्येक घरातील एक स्त्री वा पुरुष शेतकरी आपल्या घरचे फावडे, कुदळ, घमेले आणि दुपारच्या जेवणासाठी भाजी-भाकरी सोबत घेऊन गावांच्या किनारी भागातील फुटलेल्या संरक्षक बंधा-यांच्या दुरुस्तीकरिता श्रमदान करण्याकरिता निघाले होते. श्रमदान करण्यासाठी निघालेला हा प्रत्येक जण गुरुवारी केलेल्या दिवसभराच्या श्रमदानाने खरेतर पूर्णपणे थकून गेला होता; परंतु आपल्याच गावाच्या आणि आपल्याच कुटुंबाच्या बचावासाठी दुसºया दिवशीदेखील न थकता श्रमदान करणे अपरिहार्य असल्याने कुणाच्याही कपाळावर तक्रारीची आठी नव्हती.समुद्र संरक्षक बंधाºयांची कामे रोजगार हमी योजनेतून घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आहे; परंतु गावातील सर्व शेतकºयांची जॉब कार्ड तयार नसल्याने, कामास शासकीय मंजुरी मिळण्याची प्रक्रिया झालेली नसल्याने, प्रत्यक्ष रोजगार हमी योजनेतून कामे सुरू होण्यास अद्याप काही कालावधी लागणार आहे. मात्र, येत्या गुरुवारी, १५ फेब्रुवारी रोजी असलेल्या अमावास्येपूर्वी सद्यस्थितीतफुटलेल्या संरक्षक बंधाºयांची दुरुस्ती (खांडी बुजविणे) केली नाही, तर पुन्हा गुरुवारी अमावस्येच्या उधाणाला समुद्राचे पाणी भातशेती पार करून थेट गावात आणि घरांत घुसण्याची दाट शक्यता आहे. यामुळे सारे ३०० स्त्री-पुरुष शेतकरी ग्रामस्थ गुरुवारपासून श्रमदान करून फुटलेले संरक्षक बंधारे दगड-चिखलमाती घालून बुजवण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत.शुक्रवारी मोठे शहापूर गावांच्या धरमतर खाडीकिनारच्या मोठ्या संरक्षक बंधाºयास पडलेली भगदाडे दरड-माती चिखल यांनी भरून काढून हा बंधारा दुरुस्त करण्यात आल्याची माहिती श्रमिक मुक्तिदलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गुरुवार व शुक्रवार अशा दोन दिवसांतील ३०० स्त्री-पुरुष शेतकºयांच्या श्रमदानातून बंधारे दुरुस्तीचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित बंधारे दुरुस्तीकरिता शनिवारीदेखील श्रमदान करावे लागणार असल्याचे भगत यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड