शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यांमध्ये रस्ते दाखवा, बक्षीस मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 23:22 IST

ग्रामस्थांची घोषणा : रस्त्याअभावी दैनंदिन व्यवहारात अडचणी; प्रशासनाकडून वर्षानुवर्षे दुर्लक्षच

- कांता हाबळे

नेरळ : मुंबई आणि उपनगरांमध्ये ‘खड्डे दाखवा आणि बक्षीस मिळावा’ अशी घोषणा करण्यात आली होती; परंतु कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरातील १५ आदिवासी वाड्यांंमध्ये ‘डांबरी रस्ते दाखवा आणि बक्षीस मिळावा’ अशी घोषणा ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीमधील बेकरेवाडी, आसलवाडी, नाण्याचा माळ, भुतिवलीवाडी, बोरीची वाडी, सागाची वाडी आदी वाड्यांंमधील आदिवासी बांधवांना वर्दळीसाठी रस्ते नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावरील माती वाहून जात असल्याने केवळ दगड-गोटे जमा होतात.

बेकरेवाडी ते जुमापट्टी या दोन ते अडीच कि.मी.पर्यंत ये-जा करताना आदिवासी बांधवांना कसरत करावी लागते. एखादा रु ग्ण गंभीर असले तर त्याला आजही झोळीचा वापर करून न्यावे लागते. आदिवासी बांधव दरवर्षी आदिवासी श्रमदानातून कच्चा रस्ता तयार करतात. मात्र, पावसाळ्यात तो वाहून जातो. लोकप्रतिनिधी अथवा स्थानिक प्रशासनाने मात्र अद्याप या आदिवासीवाड्यांना रस्त्यासारखी मूलभूत सुविधाही पुरवलेली नाही.

थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान जगाच्या नकाशावर प्रसिद्ध आहे. वर्षभर लाखो पर्यटक माथेरानला येत असतात; परंतु माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासीवाड्या मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. वनविभागाची जागा असल्याचे कारण संबंधित अधिकारी पुढे करतात.आठ वर्षे श्रमदानातून बांधले रस्तेसतत आठ वर्षे येथील आदिवासी बांधव श्रमदान करून रस्ते करत आहेत. मागील वर्षी अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी केली; परंतु अद्याप रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे काम केले नाही. हे रस्ते डोंगर-दºयातील असल्याने दैनंदिन व्यवहारातही आदिवासींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. घरगुती साहित्य, अन्य सामान डोक्यावर घेऊन जावे लागत आहे. यामुळे शासनाने लवकरात लवकर आदिवासीवाड्यांतील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.

टॅग्स :Matheranमाथेरान