शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

शिवप्रेमींमध्ये जल्लोष, सर्वत्र शिवाजी महाराजांचा जयजयकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:42 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराजाचा विस्तार ज्या राजधानीच्या ठिकाणावरून केला

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. जय भवानी... जय शिवाजी...! या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकांमुळे जिल्हा ‘शिवमय’ झाला होता. मिरवणुकीमध्ये मुस्लीम बांधवांनी भगवे फेटे बांधून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यामुळे ंिहंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडले. किल्ले रायगडावर बुधवारी सकाळपासूनच छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली होती. जिल्ह्यात अनेक ठिकाणी सायंकाळी निघालेल्या मिरवणुकाही लक्षवेधी ठरल्या.छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराजाचा विस्तार ज्या राजधानीच्या ठिकाणावरून केला, त्या रायगड जिल्ह्यात बुधवारी मोठ्या शांततामय वातावरणात शिवजयंती साजरी झाली. अलिबाग येथील कुलाबा किल्ल्यात सकाळपासून शिवप्रेमींच्या रांगा लागल्या होत्या. समुद्राला भरती असतानाही या शिवप्रेमींनी ओहोटीची वाट न पाहता शिवघोषणा देत किल्ल्यात प्रवेश केला. याचप्रमाणे रायगडमधील गडकिल्ल्यांवर शिवप्रेमींचा दिवसभर राबता होता. अलिबाग, मुरुड, रोहा येथील युवा मंडळांनी साजरा केलेला शिवजयंती उत्सव विशेष लक्षणीय ठरला. जिल्ह्यात साजऱ्या झालेल्या उत्सवास मराठी परंपरा आणि संस्कृतीची झालर दिसत होती. अलिबाग नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले.पारंपरिक पोशाखशिवजयंतीनिमित्त अभिवादनासह आपल्या राजाबद्दल असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी तमाम शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. हातात शिवध्वज, भगवे फेटे, भगवे जॅकेट, भगवा कुर्ता परिधान केलेल्या युवकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. मात्र, यात अबालवृद्धपुरु षांसह महिलाही मागे नव्हत्या. नऊवारी, नाकात नथ आणि डोक्यावर भगवा फेटा अशा पारंपरिक पेहरावात महिलांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.महाडमध्ये शिवजयंती उत्साहातमहाडमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाड नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी सर्व सभापती, नगरसेवक अधिकारी उपस्थित होते. प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्यासह विविध शासकीय अधिकारी यांनीही शिवरायांना अभिवादन केले. शिवजयंतीनिमित्त राज्यभरातून किल्ले रायगडावर शिवभक्तांनी आणलेल्या शिवज्योतींचे शिवाजी चौकात नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी स्वागत केले. या वेळी शिवघोषांनी महाड शहर दुमदुमून गेले होते. तालुक्यातील अनेक गावांत तसेच शासकीय कार्यालयांतही शिवजयंती साजरी करण्यात आली. लोकविकास प्रतिष्ठानतर्फे शिवाजी महाराज चौकात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यानिमित्त शिवाजी चौकात नगरपरिषदेने रोषणाई केली होती.शिस्तप्रियतेचे दर्शनकोणताही उत्सव साजरा करताना रायगडकर शिस्तीचे पालन करतात. त्याचप्रमाणे आजच्या शिवजयंतीनिमित्ताने रायगडकरांनी शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू न देता उत्सव साजरा केला. शिवजयंती साजरी करणाºया मंडळींनी आधीच पोलिसांकडे रीतसर परवानग्या घेतल्या होत्या. मिरवणूक उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जिल्हा पोलीस विभागाकडून ६१ पोलीस अधिकारी, ४२५ पोलीस कर्मचारी, ४ दंगल नियंत्रण पथकांची नेमणूक करण्यात आली होती.बोर्ली पंचतनमध्ये शिवजयंती उत्साहात साजरीश्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन विभागातील मावळा संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती थाटामाटात साजरी झाली. बोर्ली पंचतन होळीचे पटांगणाहून महाराजांचा पुतळा ठेवून सजविलेला रथ, तसेच तरुणांची मोटरसायकल रॅली व महाराजांच्या जयघोषाने बोर्ली पंचतन गाव दुमदुमून गेले होते. ही रॅली बोर्ली पंचतन येथून सुरू होऊन कापोली, शिस्ते, वडवली, दिवेआगर, वाळवटी चिखलप मार्गे श्रीवर्धन येथील पेशवे मंदिर येथे या रॅलीची सांगता करण्यात आली. या वेळी मावळा संघटनेचे अध्यक्ष निखिल कांबळे, उपाध्यक्ष अनिल पांगारे, सचिव सुमित सावंत, खजिनदार कौशल वाणी आदी पदाधिकारी, सदस्यांसह शिवभक्त उपस्थित होते. बोर्ली पंचतन, वडवली, दिवेआगर, शिस्ते, कापोली या गावातील सुमारे ५०० ते ६०० मोटरसायकलस्वार तरुण-तरुणी यामध्ये सहभागी झाले होते. महिलांचादेखील उत्साह दांडगा होता.

टॅग्स :Raigadरायगड