शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रायगडात पाच लाख लिटर दुधाचा तुटवडा; कृषीपूरक जोडधंद्याकडे फिरवली पाठ

By निखिल म्हात्रे | Updated: December 18, 2023 13:18 IST

रायगड जिल्ह्याची एकेकाळी भाताचे कोठार अशी ओळख होती. शेतीला जोड म्हणून दूधदुभती जनावरे पाळली जायची. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात औद्योगिकरण वाढले आहे.

अलिबाग - रायगड जिल्ह्यात कृषी क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे, त्याचा फटका या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या कृषीपूरक जोड धंद्याला बसतो आहे. जिल्ह्याला दररोज 8 लाख 30 हजार लिटर दुधाची गरज आहे. मात्र केवळ 3 लाख 38 हजार लिटर दूध उत्पादित होत असल्याने सुमारे 5 लाख लिटर दूध पुणे, कोल्हापूर, नगर, गुजरात येथून रायगडमध्ये येते. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कृषी क्षेत्रावर आधारित विविध उद्योगांची घसरण होऊ लागली आहे. कृषी क्षेत्रच कमी झाल्याने गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर पर्यटन व्यवसायात संधी निर्माण झाल्याने तरुणवर्ग पर्यटन व्यवसायाकडे वळला आहे. याचा मोठा फटका येथील दुग्ध व्यवसायाला बसला असून मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी होत आहे.

रायगड जिल्ह्याची एकेकाळी भाताचे कोठार अशी ओळख होती. शेतीला जोड म्हणून दूधदुभती जनावरे पाळली जायची. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात औद्योगिकरण वाढले आहे. मोठमोठ्या औद्योगिक वसाहती जिल्ह्यात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शेती क्षेत्र कमी झाले आहे. शेती कमी झाल्याने हिरवा चारा उपलब्धता कमी झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायही घटले आहे. मुंबई, पुण्यासारखी मोठी शहरे रायगड जिल्ह्यालगत असल्याने तरुण वर्ग नोकरीसाठी शहरात स्थलांतरित होत आहे. त्यामुळे कृषी व्यवसायाशी निगडित जोडव्यवसायही कमी झाले आहेत. परिणामी जिल्ह्यात दिवसेंदिवस दुधाची टंचाई जाणवत आहे.

18 दूध उत्पादक सहकारी संस्था -दूध उत्पादन वाढीसाठी सहकारी संस्था चांगले काम करतात. यासाठी राज्य सरकारकडून काही सवलतीही संस्थांना दिल्या जातात. प्रत्येक जिल्ह्यात या साठी वेगळ्या कार्यालयाची निर्मिती केली आहे. परंतु रायगड जिल्ह्यात या कार्यालयाचे काम बसण्यात जमा आहे. जिल्ह्यात दुग्ध संकलन करणाऱ्या नोंदणीकृत 135 सहकारी संस्था आहेत. त्यातील 18 कार्यरत असून त्यांच्याकडून 1573 प्रतिदिन दूध संकलन होते. यात अवसायानात निघालेल्या 117 संस्था आहेत.

लोकसंख्येच्या तुलनेत पशुधन कमी - जिल्ह्यामध्ये देशी गायी, संकरित गायी आणि म्हैसवर्गीय जनावरांची एकूण संख्या 2 लाख 39 हजार 131 आहे. यातील 30 टक्के जनावरे दूध देणार आहेत. या जनावरांद्वारे दररोज एकूण 3 लाख 37 हजार 977 लिटर दूध उपलब्ध होते. जिल्ह्याला दररोज 8 लाख 29 हजार 773 लिटर दुधाची गरज आहे. रायगड जिल्ह्याची लोकसंख्या 2011 च्या जनगणेप्रमाणे 26 लाख 34 हजार आहे. दहा-बारा वर्षात जिल्ह्याची लोकसंख्या वाढली आहे. तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुधाची मागणी प्रचंड वाढली आहे.

दूध उत्पादन देणारे पशुधन -देशी गायी- 1,70,388 (दुभत्या 51,116), दूध उत्पादन- 2,04,464संकरित गायी – 6,518 (दुभत्या 1955), दूध उत्पादन- 21,505म्हैस वर्ग – 62,225 (दुभत्या 18,668), दूध उत्पादन – 1,12,008एकूण- 2,39,131 (दुभती- 71,739), दूध उत्पादन – 337977