शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

माणगाव शहरातील स्वस्तिक कॉम्प्लेक्समधील दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 00:28 IST

महाड, रोहा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने मिळवले नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : शहरातील मुंबई-गोवा महामार्गानजीक असणाऱ्या मोतीराम प्लाझासमोर स्वस्तिक कॉम्प्लेक्समधील  कॉटन किंग शोरुम शेजारी असणाऱ्या मोठ्या हायवा व मोठ्या गाड्यांचे स्पेअर पार्ट व ऑईल विक्रेते सद्गुरु  स्पेअर पार्ट दुकानाला २७ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० च्या सुमारास अचानक आग लागली. माणगाव शहरात एकच हळकल्लोळ माजला होता, मात्र माणगाव प्रशासन व पोलीस प्रशासनाने योग्यवेळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

ही आग आटोक्यात आणण्याकरिता महाड नगरपरिषद व रोहा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल व स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने आग आटोक्यात आली.  माणगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर होऊन ५ वर्षे झाली. शहराचा विकास नगरविकास खाते करत आहे. माणगाव हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे; पण अग्निशामक दल नाही. ही खंत आज प्रत्येक सुजान माणगावकर नागरिकांच्या तोंडून ऐकावयास मिळत होती. सुदैवाने तालुक्यातील घडलेल्या दोन्ही आपत्तीत जीवितहानी टळली असली तरी अग्निशमन दल माणगावला पोहोचण्यास १ तास वेळ लागतो. याकरिता माणगाव शहरास स्वतंत्र अग्निशमन दल द्यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.  अशा आपत्तीतून प्रशासन व शासन यांनी माणगाव शहराकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी देखील होत आहे.