शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मतदारयादीमध्ये बांगलादेशींचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 04:46 IST

नांदगाव ग्रामस्थांचा आरोप : प्रशासनाच्या कारभाराविषयी नाराजी

पनवेल : नांदगाव ग्रामपंचायतीच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. मतदार याद्यांमध्ये बांगलादेशी नागरिकांचा समावेश करण्यात असल्याचा गंभीर आरोप बुधवारी सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेत केला. प्रशासनाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली.

नांदगाव ग्रुपग्रामपंचायत असून सप्टेंबर महिन्यात या ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. ३३00 मतदारांचा यामध्ये समावेश आहे. या मतदार यादीमध्ये सुमारे ४५0 मतदार बोगस असल्याचा गौप्यस्फोट माजी सरपंच व विद्यमान सदस्य मनोहर भोईर यांनी केला. मतदार याद्या शुद्धीकरणाचे उपक्र म राबवून देखील मोठ्या प्रमाणात बोगस मतदार या याद्यांमध्ये भरले आहेत. या मतदारांमध्ये परप्रांतीय, बांगलादेशीचा समावेश असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. या मतदार याद्यांमध्ये २६१ स्थलांतरित, ४0 जणांचे दुबार तसेच १५0 विवाहितांचा समावेश आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने चौकशी करावी जोपर्यंत याद्यांचे शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. या वेळी सरपंच रेखा कातकरी, संदेश भगत, धनराज ठोंबरे, मनोहर भोईर, विक्र म फडके, शीतल खुटले, मीनाक्षी भोईर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.दहा जणांवर कारवाईच्नवी मुंबई, पनवेलमध्ये बांगलादेशी नागरिकांची धरपकड सुरू झाली आहे. मुंबई पोलिसांनी कळंबोली व नेरूळमध्ये केलेल्या कारवाईनंतर एनआरआय पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये धाड टाकून दहा बांगलादेशींना अटक केली आहे. रेणू अब्दुल रशीद काझी, सुफियान अब्दुल रशीद काझी, जॉन अब्दुल रशीद काझी,बेगम शमतुला शेख, शमतुला ऐनूल शेख, रियाज शमतुल्ला शेख, मुस्लीमा अफसरअली मुल्ला, अफसरअली आकेरअल्ली मुल्ला यांचा समावेश आहे. हे सर्व करावे परिसरातील रहिवासी असून मूळचे बांगलादेशीमधील नोराईल जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.रहिवासी पुरावा व नागरिकत्वाचा दाखला या आधारावर मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे नोंदविली जात असतात. नांदगाव ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांबाबतचे पुरावे आमच्याकडे सादर केल्यास नक्कीच चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.- दीपक आकडे,तहसीलदार, पनवेल

टॅग्स :ElectionनिवडणूकRaigadरायगड