शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाहीचा चालक पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 23:41 IST

दासगाव : ठाणे येथून गुहागरला जाणाऱ्या शिवशाही बसचा चालक महाड स्थानकात आला असता झोप अनावर झाल्याने झोपला. त्याला उठवण्यास ...

दासगाव : ठाणे येथून गुहागरला जाणाऱ्या शिवशाही बसचा चालक महाड स्थानकात आला असता झोप अनावर झाल्याने झोपला. त्याला उठवण्यास गेलेल्या वाहतूक नियंत्रकाला त्याने शिवीगाळ केली. बस चालवतानाही तो डुलक्या देत होता. प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाºया चालकाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले.बुधवारी मध्यरात्री ठाणे-गुहागर ही शिवशाही बस महाड स्थानकात रात्री १.४५ वाजता आली असता, बसचा चालक अविनाश अशोक मोरे याने गाडी पुढे न नेता सरळ झोप काढण्यास सुरुवात केली. वाहकाने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उठलाच नाही. या वेळी वाहतूक नियंत्रकांनी देखील उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यामुळे वाहतूक नियंत्रकांनी पोलिसांना बोलावून घेतले. महाड शहर पोलिसांनी या मद्यधुंद चालकास ताब्यात घेतले आहे. सदर चालकाची ब्रीथ अ‍ॅनालायझर मशिनने तपासणी केली असता तो नशेत असल्याचे महाड शहर पोलीस संदेश नाईक यांनी सांगितले.ठाणे-गुहागर बसमध्ये २२ प्रवासी होते. रात्री हा प्रकार घडल्याने प्रवासी देखील भयभीत झाले. या प्रवाशांना महाड आगाराच्या बसमधून पुढे रवाना केले असल्याचे वाहतूक नियंत्रक शिवाजी जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Shivshahiशिवशाही