शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोंढवी किल्ल्यावर खोदकामात सापडल्या शिवकालीन मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 00:46 IST

तालुक्यातील आठगाव भैरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोंढवीसह चोळई, गाजवणे, खडकवणे, धामणदेवी, फणसकोंड, गोलदरा, तळ्याचीवाडी या गावांचे आराध्यदैवत जोगेश्वरी मंदिराच्या पूर्व बाजूस पाण्याच्या साठवण टाकीसाठी खोदकाम करीत असताना या मूर्ती आढळल्या. या मूर्ती मध्ययुगीन व शिवकाळातील आहेत. या मूर्तींमध्ये श्री गणेश, भैरी, जोगेश्वरी, वाघजाई वीर इत्यादींचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पोलादपूर : तालुक्यातील ऐतिहासिक कोंढवी किल्ल्यावर भैरवनाथ, जोगेश्वरी मंदिराच्या जीर्णोद्धार समयी खोदकाम करताना शिवकाळातील १५ मूर्ती सापडल्या आहेत.             तालुक्यातील आठगाव भैरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोंढवी येथे मंदिराचे काम करताना पाण्याची टाकी बांधण्यासाठी शिवकाळातील १५ मूर्ती सापडल्या. या मूर्तीमध्ये भैरी, जोगेश्वरी, वाघजाई, वीर मूर्ती तसेच गणेश मूर्ती इत्यादी मूर्तींचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात मूर्ती सापडल्यामुळे पोलादपूर तालुक्यासह कोकणातील भाविकांची या कोंढवी गडाकडे दर्शनासाठी रीघ लागली आहे.तालुक्यातील आठगाव भैरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोंढवीसह चोळई, गाजवणे, खडकवणे, धामणदेवी, फणसकोंड, गोलदरा, तळ्याचीवाडी या गावांचे आराध्यदैवत जोगेश्वरी मंदिराच्या पूर्व बाजूस पाण्याच्या साठवण टाकीसाठी खोदकाम करीत असताना या मूर्ती आढळल्या. या मूर्ती मध्ययुगीन व शिवकाळातील आहेत. या मूर्तींमध्ये श्री गणेश, भैरी, जोगेश्वरी, वाघजाई वीर इत्यादींचा समावेश आहे.कोकण इतिहास परिषदेचे प्रा. अंजय धनावडे तसेच इतिहास संशोधक प्रवीण भोसले यांनी या मूर्तींसंदर्भात त्या चौदाव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंतच्या असल्याचे नमूद केले आहे. या मूर्तीअगोदरसुद्धा येथे शिवलिंगाखालील पीठ, दिवा तसेच मध्ययुगीन भांड्यांचे अवशेष सापडले.

श्री भैरवनाथ जोगेश्वरी प्राचीन मंदिर n कोंढवी हे आदिलशाही काळापासून एक प्रमुख परगणा म्हणून महत्त्वाचे ठिकाण प्रसिद्ध आहे. शिवकाळात या कोंढवी गडाचे फार महत्त्व होते. कोकण व घाटमाथ्यावर जाणाऱ्या प्रमुख मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला गेला. श्री भैरवनाथ जोगेश्वरी हे मंदिर प्राचीन काळापासून कोंढवी येथे अस्तित्वातआहे.n येथे मुंबई, पुणे, बडोदे या ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणात  पर्यटक व शिवभक्त भेटी देतात. मात्र, येथे कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे भक्तांची गैरसोय होते. तरी या स्थळास शासनाने पर्यटनस्थळ व तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, व येथे यात्रा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, ही आमची प्रमुख मागणी असल्याचे आठगाव भैरी देवस्थानचे अध्यक्ष श्री भाई एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.