शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुरुस्तीसाठी शिवसेनेचा एल्गार, ‘खड्डे खोदो’ आंदोलन करून प्रशासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 02:09 IST

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्ट येथून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे गेली तीन वर्षे खड्डेमय झालेल्या दिघी-वडवली फाटा-म्हसळा-माणगाव या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासन करीत

बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्ट येथून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे गेली तीन वर्षे खड्डेमय झालेल्या दिघी-वडवली फाटा-म्हसळा-माणगाव या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासन करीत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ श्रीवर्धन शिवसेना संघटनेच्या वतीने वेळास गावाजवळील शंकर मंदिराजवळ ‘खड्डे खोदो’ आंदोलन करण्यात आले. येत्या आठ दिवसांत जर शासनाने व दिघी पोर्ट प्रशासनाने रस्त्याच्या डागडुजीकडे लक्ष दिले नाही, तर शिवसेना स्टाइलने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडून दिघी पोर्टमधून होणारी अवजड वाहतूक बंद पाडून दिघी पोर्टला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख रवि मुंढे यांनी दिला.श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्टच्या अवजड वाहतुकीमुळे दिघी-वडवली फाटा-मेंदडी-म्हसळा-साई-माणगाव या ५७ किलोमीटरच्या रस्त्याची गेल्या तीन वर्षांपासून दयनीय अवस्था झाली आहे. विविध प्रकारे पाठपुरावा करूनही, तसेच विविध उपोषण होऊनही प्रशासन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दखल घेत नसल्याने शिवसनेच्यावतीने शुक्रवारी वेळास गावाजवळील शंकर मंदिराजवळ ‘खड्डे खोदो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जनतेच्या समस्यांबाबत कोणत्याही प्रकारचे सोयर-सुतक त्यांना नाही, त्यांच्याकडे रस्त्यासंदर्भात अनेकदा पाठपुरावा केला; पण दोन दिवसांत कामाला सुरुवात करतो, असे आश्वासन दिघी पोर्टच्या मालकाने अनेकदा दिले; परंतु रस्त्याच्या कामाची दुरुस्ती झाली नाही, उलट नागरिकांच्या त्रासात वाढ होत आहे. पावसाळा संपून दोन महिने उलटले तरी दिघी ते माणगाव रस्त्याच्या दुरुस्तीकडे कोणाचेच लक्ष नाही, म्हणून शुक्रवारी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. येत्या आठ दिवसांत शासनाने व दिघी पोर्ट प्रशासनाने रस्त्याच्या डागडुजीकडे लक्ष दिले नाही, तर आंदोलनाचा इशारा रवि मुंढे यांनी दिला. यासाठी येत्या चार दिवसांत शासनाने दिघी पोर्टचे मालक कलंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावून रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावावा व रस्ते दुरुस्त करताना दर्जाचे काम करून घ्यावे, असे आवाहन केले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना