शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कृषी, कामगार कायद्याच्या विरोधात शेकापचे रणशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 23:26 IST

२६ नोव्हेंबरला ‘भारत बंद’ची हाक

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला आहे. केंद्राच्या शेतकरी आणि कामगार कायद्यांना विरोध करण्याचा निर्धार राज्यातील शेतकरी कामगार पक्षासह सर्व शेतकरी संघटनांनी केला आहे. केंद्र सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी २६ नोव्हेंबरला ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे, अशी माहिती शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिली. याच दिवशी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा घाट घातला आहे. त्यांचा हा डाव कदापि यशस्वी होऊ दिला जाणार नाही. या कायद्यातील तरतुदी अतिशय भयानक आहेत. सिलिंग रद्द, शेतकरी असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव दिला जाणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्याच रद्द करण्यात येणार आहेत. याला देशभरातून कडाडून विराेध होणे गरजेचे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. निसर्ग चक्रिवादळात झालेले नुकसान अजूनही भरून देण्यात आलेले नाहीत. कित्येक नुकसानग्रस्त अद्यापि मदतीपासून वंचितच आहेत. झाडनिहाय मदत देतानाही अतिशय अन्याय करण्यात आला आहे, असे सांगून त्यांनी राज्य सरकारवरही टीकेची झोड उठवली. कोरोनामुळे ओढवलेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी छोट्या-मोठ्या उद्योगांना सरकारने आर्थिक मदत करण्याची गरज आहे. या कालावधीत आलेले भरमसाट वीजबिल पूर्णपणे माफ केलेच पाहिजे, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली. अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनाही पुरेशी नुकसानभरपाई दिलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. योग्य पंचनामे करण्यात आलेले नाहीत. जिल्ह्यात आरोग्य सेवा योग्य नसल्याने अनेकांचे जीव जात असल्याने ही सेवा सुधारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. रोहा तालुक्यातील प्रस्तावित औद्योगिक कारणांसाठी जमीन खरेदीबाबतही जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त करीत स्थानिक भुमिपूत्रांना उध्वस्त करणाऱ्या सरकारच्या धोरणाविरोधात शेकापक्ष ठामपणे उभा राहणार असल्याची ग्वाही दिली. मोर्चा यशस्वी करण्यासाठी गावागावांत बैठका घेऊन वातावरणनिर्मिती करण्याचे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार सुभाष पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, औरंगाबादचे जिल्हा चिटणीस काका शिंदे, जिल्हा परिषदेेच्या अर्थ व बांधकाम सभापती अ‍ॅड. नीलिमा पाटील, समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, माजी सभापती प्रमोद पाटील, महिला आघाडीच्या नेत्या नगरसेविका चित्रलेखा पाटील, रायगड बाजारचे अध्यक्ष नृपाल पाटील, अ‍ॅड. प्रसाद पाटील, राजिम बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.