शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग ब्राह्मण आळीतील गटारांचे काम अर्धवट; छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले

By निखिल म्हात्रे | Updated: January 5, 2024 19:35 IST

अर्धवट बांधलेल्या गटारांवर झाकणे नीट लावली नसल्याने सर्वत्र दुर्गंधी

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: नगरपरिषद अलिबाग यांच्या मार्फत सुरू असलेले अलिबाग ब्राम्हण आळी राममंदिरा समोरील गटाराचे काम गेले तीन महिने सुरू असून ते अर्धवट ठेवल्याने लगतच्या रस्त्यावर अपघात तसेच सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. परिसरातील नागरिक याबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत. अर्धवट बांधलेल्या गटारांवर झाकणे नीट लावली नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. छोटे मोठे अपघात होणे नित्याचे झाले आहे.

काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत भूमिगत गटाराची योजना अलिबाग राबवली जाणार होती; परंतु तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प अपयशी ठरला. आता पुन्हा राज्य सरकारच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत नव्याने भूमिगत गटार योजना राबवली जाणार आहे. ८५ कोटी रुपयांचा प्रस्तावित प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.अलिबाग शहराची भौगोलिक रचना बशीसारखी आहे. खोदाई केल्यावर पाणी लागते. त्यामुळे हा प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केला जाणार आहे. राज्यात पहिल्यांदाच होरिझोन्टल डायरेक्शनल ड्रीलिंग या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रकल्पाचे काम केले जाणार आहे. कमीत कमी उत्खनन असणार आहे.टेक्नॉलॉजीमार्फत भुयारा गटार साठी नवीन प्रयोग राबवले जाणार असल्याची माहिती नगरपरिषदेकडून देण्यात आली आहे. असे असताना हा अर्धवट गटारांच घाट ठेकेदारांना पोसण्यासाठी घातल आहे का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी विचारला आहे.

टॅग्स :alibaugअलिबाग