शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिवथरघळीतील खडकाची झीज

By admin | Updated: July 17, 2017 01:24 IST

महाड तालुक्यातील शिवथरघळ या दासबोध ग्रंथाच्या निर्मिती ठिकाणावरील घळीला मुख्य आधार असलेल्या खडकाची झीज होत

लोकमत न्यूज नेटवर्कबिरवाडी/महाड : महाड तालुक्यातील शिवथरघळ या दासबोध ग्रंथाच्या निर्मिती ठिकाणावरील घळीला मुख्य आधार असलेल्या खडकाची झीज होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे येथे दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.दासबोध ग्रंथाचे जन्मस्थान असलेल्या शिवथरघळ येथील श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या देखरेखीखाली असणाऱ्या समर्थ रामदास स्वामी यांच्या या घळीला आधार देणारे नैसर्गिक दगडाच्या खांबांची दिवसेंदिवस झीज होत आहे. त्यावर वेळीच योग्य ती उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच जुन्या दगडी भिंतीला देखील तडे गेल्याने याठिकाणी या संरक्षक भिंतीची पुनर्बांधणी करणे आवश्यक असल्याचे महाड तालुक्यातील वरंध जिल्हा परिषद मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथाची निर्मिती याचठिकाणी केली होती. याठिकाणी समर्थ रामदास व कल्याण स्वामी यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. सन १९३० मध्ये या घळीचा शोध लागला आहे. तेव्हापासून याठिकाणी दरवर्षी हजारो भाविक व पर्यटक या घळीला भेट देत असतात. मात्र या घळीच्या नैसर्गिक आधार असलेल्या खडकाची झीज होत असल्याने भूगर्भ वैज्ञानिकांकडून कुंभेशिवथर येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या घळीची पाहणी करण्यात यावी, अशी मागणी राजिप सदस्य मनोज काळीजकर यांनी प्रशासनाकडे केली आहे. याबाबत रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे महाड येथील उपअभियंता एस. जी. शिर्के यांच्याशी संपर्कसाधला असता महाड पंचायत समितीच्या ३0 जून रोजी झालेल्या शिवथरघळ येथील मासिक सभेमध्ये याविषयी चर्चा झाली असून सुंदरमठ सेवा समिती शिवथरघळ सुंदरमठ उपसमिती यांनी याबाबत तातडीने लक्ष देवून योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे शिर्केयांनी स्पष्ट केले आहे.