शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

महाडमध्ये सातव्या दिवशीही पुराचा वेढा; जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:45 IST

तीन दिवसांपासून व्यवहार ठप्प; लाखो रु पयांचे नुकसान; शिवथरघळई-चेराववाडी मार्गावर कोसळली दरड

महाड/ दासगाव : शहरात पुराचा उच्छाद रविवारी सलग सातव्या दिवशीही कायम होता. शहरातील सुकट गल्ली, दस्तुरी नाका, गांधारी नाका, महाड बाजारपेठेत पुराचे पाणी कायम होते. कधी नव्हे ते चवदार तळ्यातील पाणी देखील रात्री रस्त्यावर आल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पाणी अधूनमधून ओसरत आहे, तर अधूनमधून वाढत आहे. त्यामुळा शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आठ दिवसांपासून शहरात ठाण मांडून बसलेल्या पुरामुळे मुख्य बाजारपेठेतील व्यवहारही मंदावले असून, लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. सलग सात दिवस शहरात पुराचे पाणी येण्याचा हा प्रकार महाडकरांनी प्रथमच अनुभवला आहे.गेल्या आठ, दहा दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबलेला नसल्याने, तालुक्याच्या ग्रमीण भागातही जनजीवन ठप्प झाले आहे. या पावसामुळे महाड-रायगड मार्ग आणि महाड-म्हाप्रळ मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. शिवथर-पारमाची रस्त्यालाही मोठमोठे तडे गेल्याचे आढळून आले आहे. शिवथरघळई-चेराववाडी मार्गावर दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक देखील बंद पडली आहे.एसटी वाहतुकीवर परिणामपाचाड येथील गोविंद पांडूरंग भोसले यांच्या घराची भिंत शनिवारी रात्री कोसळली. या घरात एक वृध्द महिला अडकली होती. घरच्या लोकांनीच या महिलेला बाहेर काढले. तेलंगे मोहोल्ला येथे एक घर कोसळले आहे, तर रेवतके येथे एका घरावर झाड कोसळण्याची घटना घडल्याची माहिती आपत्ती निवारण कक्षातून देण्यात आली. महाड परिवहन आगारातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसेस पनवेलपर्यंत सोडण्यात येत आहेत. ताम्हाणीमार्गे पुणे एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. भोरमार्गे पुणे वाहतूक सुरू असल्याची माहिती महाड परिवहन आगाराच्या सुत्रांकडून देण्यात आली.पुनाडे गावाजवळ रस्त्यालगत जमिनीला तडेकिल्ले रायगड परिसरात असलेल्या रायगड -पुनाडे -निजामपूर -माणगाव या मार्गावर देखील पुनाडे गावाजवळ रस्त्यालगत भली मोठी भेग पडली आहे. जमिनीला पडलेल्या या भेगेमधून पाणी वाहत असून एकीकडे असलेल्या उतारामुळे हा रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे. या मार्गावरून प्रवासी, स्थानिक नागरिक ये -जा करीत असतात. जमिनीला पडलेल्या भेगा, वाहून गेलेला सावरट रस्ता यापासून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र अनभिज्ञ आहे. याठिकाणी अद्याप कोणतीच सुरक्षेचा उपाय करण्यात आलेला नाही.पावसाबरोबर अफवांना महापूरगेला पावसाने हाहाकार माजवला आहे. या मुसळधार पावसात सोशल मिडीयावर अफवांचा देखील महापूर आला आहे. महाडमध्ये सोशल मिडीयावर याबाबत फोटो टाकून अफवा पसरवल्या जात आहेत. महाड जवळील मोहोप्रे पुलाला गेलेले तडे, आंबेत पूल वाहून गेल्याची माहिती आदीबाबत अफवा पसरवण्यात आल्या. अखेर जिल्हा प्रशासनाने याबाबत सोशल मिडीयावरच अफवा न पसरवण्याचे आवाहन करून कारवाई करण्याचे सूचित केले आहे.पाचाड- सावरट मार्ग वाहून गेल्याने सहा गावांचा संपर्क तुटलामहाड तालुक्यातील किल्ले रायगड परिसरात पावसाचे भयंकर रूप पहावयास मिळत असून पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दूरध्वनी, आणि वीज यंत्रणा कोलमडली आहे. तर या विभागातील पाचाड बांधणीचा माळ सावरट हा दुर्गम मार्ग वाहून गेला आहे.बांधणीचा माळ ते सांदोशी या दरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे हा मार्ग मुसळधार पावसात वाहून गेला आहे. यामुळे या विभागातील सावरट, सांदोशी, करमर, कावळे, खलई, बावळे या गावांचा संपर्क तुटला आहे. या गावांना जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे.रस्ता वाहून गेल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. हा सर्व भाग दुर्गम असल्याने मुसळधार पावसामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा, बाजारपेठ, बँक व्यवहार आदी कामासाठी येणे कठीण झाले आहे. महाड, पाचाड येथे ये -जा करण्यासाठी एसटी एकमेव पर्याय आहे. मात्र एसटी वाहतूक देखील बंद झाली आहे. 

टॅग्स :floodपूर