शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये सेक्स रॅकेट चालविणारे सात अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 03:29 IST

पुण्यातील ११ मुलींची सुटका; आरोपींना १ नोव्हेंबरपर्यंत कोठडी

- जयंत धुळप अलिबाग : मुलींना पर्यटनाच्या नावाखाली पुण्यातून अलिबाग येथे आणून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या पाच जणांना रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने अटक केली. शनिवारी रात्री अलिबागमधील तीन हॉटेलवरील छाप्यात, पुणे जिल्ह्यातील तळेगाव-दाभाडे येथील दोन महिला दलाल, दोन वाहनचालक आणि अलिबागमधील तिघा हॉटेल व्यावसायिकांसह ११ पीडित मुली, महिलांना ताब्यात घेण्यात आले.रविवारी दुपारी सर्वांना न्यायालयात हजर केले असता, पाचही आरोपींना १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर ११ पीडितांना सुधारगृहात दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हॉटेल विठोबा-रुक्मिणी कॉटेज, हॉटेल रविकिरण आणि हॉटेल मीरामाधव येथे सापळा रचून बनावट गिºहाईक पाठवून खातरजमा केल्यावर छापे टाकण्यात आले. कल्पना केशव मेंगडे (रा. शनिवार पेठ, तळेगाव-दाभाडे) आणि किरण राजू साळुंखे (रा. परमार पार्क, पुणे) व वाहनांचे चालक विश्वनाथ ज्ञानेश्वर ठाकर (रा. मालेगाव) व शिवाजी राम शिंदे (रा. निगडी-पुणे) यांच्यासह ११ पीडितांना ताब्यात घेण्यात आले, असे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी सांगितले.गुन्हा दाखलहॉटेल व्यवसाय करताना पर्यटकांची योग्य नोंद रजिस्टरमध्ये करून न घेता त्यांना रूम्स दिल्या कारणास्तव हॉटेल व्यावसायिक प्रसाद नागवेकर, नीलेश राऊळ व मिथुन कामत यांनाही ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जे.ए. शेख यांनी दिली.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाalibaugअलिबाग