शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये गंभीर स्वरूपाचे दिवसाला सात ते आठ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:29 IST

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सध्या कमी 

निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग :  कोरोना विषाणूची दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला काही प्रमाणात यश आले असले, तरी दमा, हायपर टेन्शन, हृदय विकाराच्या आजारांनी डोके वर काढले आहे. दिवसाला सात ते आठ गंभीर स्वरूपाचे रुग्ण उपचार करून घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सध्या कमी झाले आहे.

    ताणतणाव, चुकीचा आहार आणि आरामदायी जीवनशैली यांच्यामुळे आज समाजात हृदयविकाराची समस्या झपाट्याने वाढत चालली आहे. आजारातून बरे होण्यासाठी रुग्णाला काही माहिती देणे ही प्राथमिक अवस्था असली, तरी चुकीची माहिती देणे किंवा अनावश्यक माहिती फार मोठ्या प्रमाणावर देण्यातून रुग्णाचे नुकसानच अधिक होऊ शकते. विशेषतः सध्याच्या परिस्थितीत, कोरोना साथीच्या निमित्ताने कोणती औषधे घ्यावीत, रोग कसा टाळावा, त्याची लक्षणे अशा माहितीची देवाण-घेवाण प्रचंड प्रमाणात होत आहे. अशा प्रसंगी, हृदयविकाराची खरी लक्षणे ओळखणे, उच्च रक्तदाबाचा धोका कोणता आणि त्यामध्ये कोरोनाचा संबंध कसा येतो, याविषयी खरी माहिती रुग्णांना मिळणे आवश्यक आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे थंडी-तापासह घसादुखी आणि खोकला यांची तक्रार करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसते. हे आजार गंभीर नसले, तरी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची लागण इतरांनाही होऊन रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती असल्याचे डॉक्टर सांगतात. 

यंदा हवामान बदलामुळे वाढली रोगराई यंदा हवामानाच्या या बदलत्या वेळापत्रकामुळे रोगराई वाढली आहे. घसादुखी, खोकला यांसारखे आजार सामान्य असल्याने घाबरून जाऊ नये. मात्र, केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता, गांभीर्य ओळखून वैद्यकीय सल्ला घेतल्यास आजार आटोक्यात येतो, अशी प्रतिक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजीव तंबाळे यांनी दिली आहे.