शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ प्रवाशाला एसटीत मारहाण

By admin | Updated: September 26, 2015 00:57 IST

वेळ निघून गेल्यानंतरही एसटी न सुटल्याने बस का थांबली, असा प्रश्न करणाऱ्या ज्येष्ठ प्रवाशाला आपण एसटी अधिकारी असल्याचे सांगत एकाने साथीदारासह मारहाण

रोहा/ लोणेरे : वेळ निघून गेल्यानंतरही एसटी न सुटल्याने बस का थांबली, असा प्रश्न करणाऱ्या ज्येष्ठ प्रवाशाला आपण एसटी अधिकारी असल्याचे सांगत एकाने साथीदारासह मारहाण करीत एसटीतून बाहेर ढकलल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या झटापटीत त्याच्यातील एकाने त्या प्रवाशाच्या गळ्यातील चेनही हिसकावून घेतली. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोहा पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार बुधवारी (२३ सप्टेंबर) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास यशवंत कृष्णा खराडे (५९) हे ज्येष्ठ प्रवासी तिसे गावी येथे जाण्यासाठी रोहा-कोल्हापूर बसमध्ये चढले. वाहकाच्या सीटच्या बाजूला ते उभे राहिले. एसटी बस सुटण्याची वेळ झाल्याने त्यांनी बस का थांबली? अशी विचारणा केली. तेव्हा वाहकाच्या सीटवर बसलेल्या एकाने म्हाताऱ्या तुला काय करायचे आहे? मी एसटी खात्याचा अधिकारी आहे? माझी बॅग द्यायला पाठविले आहे, तो आला की एसटी चालू होईल, असे उर्मटपणे सांगितले.त्यामुळे यशवंत खराडे यांनी जरा जपून बोला, असे सांगितले. त्याचा राग आल्याने सीटवर बसलेली ती व्यक्ती उठली आणि आपल्या आणखी एका सहकाऱ्याच्या साथीने त्याने त्या ज्येष्ठ प्रवाशाला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यापैकी एकाने त्या प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने खेचून घेतली. त्यांना एसटीमधून खाली ढकलून दिले. या घटनेनंतर यशवंत खराडे यांनी रोहा पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली.(वार्ताहर)