शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

एकाच जमिनीची दोनदा विक्र ी

By admin | Updated: October 3, 2015 23:30 IST

एकाच जागेचा दोघांशी व्यवहार करून सुमारे 33 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक जण

खालापूर : एकाच जागेचा दोघांशी व्यवहार करून सुमारे 33 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक जण राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता असून खालापूरचे पोलीस उपनिरिक्षक सचिन काशिद या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत. खालापूरमध्ये जमिनीला सोन्याचा भाव असल्याने अनेक राजकीय पक्षांचे प्रमुख नेते व कार्यकर्ते दलालीमध्ये गुंतले असून एकच जागा दाखवून अनेकांकडून पैसे लाटल्याचे अनेक प्रकारही समोर येत आहेत.खालापूर तालुक्यातील गोरठण येथे असलेली ९ एकर जमीन संजय दौलत पालांडे यांनी २ जुलै २००७ रोजी रामदास पांडुरंग दिसले यांना विकण्यासाठी साठेकरार केला होता. या व्यवहाराचे दिसले यांनी सुमारे 33 लाख रूपये पालांडे यांना चेकद्वारे दिले होते. दिसले यांच्याकडून 33 लाख रूपये घेतल्यानंतर सदर जमिनीचा व्यवहार संभाजी पाटील यांच्या बरोबर १ आॅगस्ट २००७ रोजी करण्यात आला. या दरम्यान रामदास दिसले यांचा मृत्यु झाला. त्यांचा मुलगा कुमार याच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने आपले पैसे परत मिळावेत म्हणून पालांडे यांच्याकडे तगादा लावला होता. त्यामुळे पालांडे यांनी दिसले यांना चेक दिले होते. मात्र सदर चेक न वटल्याने कुमार दिसले यांनी खालापूर न्यायालयात दावा दाखल केला होता. या प्रकरणात तडजोड झाल्यानंतर पालांडे यांनी २८ मार्च २०१४ रोजी १३ लाख ६० हजार रूपये परत दिले होते. तर उर्विरत रकमेपाटी पुन्हा 3 चेक दिले होते. मात्र ते चेकही न वटल्याने या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात पसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पालांडे पोलीस ठाण्यात हजर झाले होते. मात्र मध्यस्ती असलेले राष्ट्रवादीचे स्थानिक नेते भगवान दळवी चार दिवस फरार होते. अलिबाग न्यायालयात दळवी यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने मान्य केला असून पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)