शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धन समुद्रकिना-याला पसंती; दिवेआगर हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 03:01 IST

बोर्ली पंचतन : नाताळ सणाची सुट्टी व सलग तीन दिवस सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी श्रीवर्धनच्या समुद्रकिना-याला पसंती दिली आहे.

बोर्ली पंचतन : नाताळ सणाची सुट्टी व सलग तीन दिवस सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी श्रीवर्धनच्या समुद्रकिना-याला पसंती दिली आहे. यामुळे श्रीवर्धन तालुका पर्यटकांनी हाउसफुल्ल झाला. सुवर्णगणेश दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन शहरातील सर्व लॉजिंग्स फुल्ल झाल्याने अचानक निघालेल्या पर्यटकांना म्हसळा येथील लॉजिंगमध्ये तर काहींना माणगावच्या रिसॉर्टचा आश्रय घ्यावा लागला. श्रीवर्धन, हरिहरेश्वर, कोंडविल येथील समुद्रकिनारेही गजबजले आहेत.पर्यटकांना समुद्रातील बोट सफर, सँड बाइक, घोडेस्वारी, उंटावरील सैर, थंडीचा मोसम असूनही समुद्रामध्ये डुंबण्याचा आस्वाददेखील घेण्याचे सोडले नाही. सलग तीन दिवस सुट्टी असल्याने नाताळच्या सुट्टीत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी बहुतांश पर्यटकांनी गैरसोय टाळण्याकरिता आगाऊ बुकिंग महिनाभर अगोदरच केली होती. दिवेआगरच्या समुद्रकिनाºयावर तसेच सुवर्णगणेश मंदिर येथे भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर सर्व प्रकारची मच्छी भरडखोल, बोर्लीपंचतन येथील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने खवय्यांची चंगळ झाली, तर शाकाहारी मंडळींनीदेखील उकडीच्या मोदकावर ताव मारला.>असंख्य वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागली. मेट्रो, उड्डाणपूल व ठिकठिकाणी चाललेली रस्त्यांची कामे व सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे सर्व जण बाहेर पडल्याने वाहतूककोंडी झाली होती. बोरीवलीहून दुपारी २.३० वाजता निघालेली गाडी तब्बल ७ वाजता नेरूळ येथे पोचली. दीड तासाच्या ३० ते ३५ किलोमीटरच्या अंतरासठी साडेचार तास लागले. तर पनवेल-पळस्पे, वडखळ, कोलाड-माणगाव रस्ता खराब असल्याने नेहमीची वाहतूककोंडी टाळण्यासाठी खोपोलीमार्गे द्रुतगती मार्गाने पाली येथे यावे लागले व २१३ रुपयांचा टोलचा भुर्दंड सोसावा लागला असल्याची प्रतिक्रिया वाहनचालक नितीन बढेकर यांनी व्यक्त के ली.